Volodymyr Zelensky y- Vladimir Putin
Volodymyr Zelensky y- Vladimir Putin esakal
ग्लोबल

Russia-Ukraine Update : युक्रेन युद्धासंदर्भात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या...

सकाळ डिजिटल टीम

आज रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांत सुरु असलेल्या युद्धाचा तेरावा दिवस आहे. काल या दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चेची तिसरी फेरी पार पडली. मात्र, या बैठकीत फार काही निष्पन्न झाले नाही. आता या दोन्ही देशांमध्ये चर्चेची चौथी फेरी होणार आहे. या युद्धासंदर्भातले तसेच भारताच्या 'ऑपरेशन गंगा'संदर्भातले लाईव्ह अपडेट्स फक्त 'सकाळ'वर...

  • युक्रेनमधील सुमी शहरामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात किमान नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एएफपीने दिली आहे.

  • पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच त्यांनी रशिया आणि युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चाही केली. केंद्रीय मंत्री देखील या प्रक्रियेत समन्वय साधण्यासाठी शेजारच्या देशांमध्ये गेले आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी हमीरपूर, हिमाचल प्रदेश येथे बोलताना दिली आहे.

  • 'ह्युमॅनिटेरीयन ऑपरेशन' करण्यासाठी आज 8 मार्च रोजी सकाळी 10:00 वा. (मॉस्को वेळ) रशियन फेडरेशनने युद्धविराम घोषित करण्यात आला असून मानवतावादी कॉरिडॉर प्रदान करण्यास तयार आहे, अशी माहिती भारतातील रशियन दूतावासाने दिली आहे.

  • काल सोमवारी खार्किव्हमध्ये झालेल्या झटापटीमध्ये आणखी एका रशियन जनरलचा मृत्यू झाला असल्याची माहिती युक्रेनने दिली आहे. रशियन सैन्यामधील आणखी एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असल्याचं युक्रेननं सांगितलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पावसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT