russia ukraine war india to buy discounted crude oil from russia which other nations have bought
russia ukraine war india to buy discounted crude oil from russia which other nations have bought  
ग्लोबल

भारताची सवलतीत रशियन कच्च्या तेलाची खरेदी; इतर देशांचे काय? वाचा

सकाळ डिजिटल टीम

रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमनामुळ जगभरातील अनेक समीकरणे बदलली आहेत. या आक्रमणानंतर रशियावर अनेक पाश्चिमात्य देशांकडून निर्बंध लादले गेले. या दरम्यान रशियाकडून सवलतीच्या दरात कच्चे तेल खरेदी करण्याच्या भारताच्या निर्णयामुळे भुवया उंचावल्या आहेत.

या दरम्यान अमेरिकेकडून याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी बुधवारी सांगितले की, भारताने रशियन तेल खरेदी केल्याने रशियाविरोधात अमेरिकेच्या निर्बंधांचे उल्लंघन झाले नाही, परंतु भारताने इतिहास लिहीला जात असताना तुम्हाला कुठे उभे राहायचे आहे, याचा विचार करा. असे आवाहन त्यांनी केले.

मात्र, भारत सरकारच्या सूत्रांनी सांगितले होते की, कायदेशीर ऊर्जा व्यवहारांचे राजकारण केले जाऊ नये आणि हे निदर्शनास आणून दिले की, रशियावर बंधने लादलेल्या देशांसह इतर अनेक देशांना रशिया अधिक तेल विकतो. तसेच जगभरातील इतरही अनेक देश रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत आहेत.

नेमके कोणते देश रशियाकडून क्रूड ऑईल खरेदी करतात

  • चीन - युरोपियन युनियन नंतर चीन हा दुसरा सर्वात मोठा रशियन तेल आयातदार आहे आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी म्हणते की समुद्रातून चिनला होणारी शिपमेंट आणखी वाढू शकते. पेट्रो-लॉजिस्टिक्स जे तेल उत्पादनावर लक्ष ठेवतात त्यांच्यानुसार सध्या रशियन क्रूड चीनकडे अधित प्रमाणात जात आहे.

  • फ्रान्स - फ्रान्सच्या 2021 मध्ये एकूण आयातीमध्ये रशियन कच्च्या तेलाचा वाटा 9.5 टक्के होता. मात्र फ्रेंच असोसिएशन ऑफ पेट्रोलियम इंडस्ट्रीने म्हटले आहे की, पर्यायी पुरवठा शोधला जाऊ शकतो आणि ते आधीच रशियन डिझेलला पर्याय शोधत आहेत.

  • जर्मनी - जर्मनीच्या सर्वात मोठी रिफायनरी मिरो (Miro) मध्ये रशियन क्रूडचा वापर सुमारे 14 टक्के आहे. जर्मनीची PCK Schwedt रिफायनरी पैकी 54 टक्के Rosneft (मॉस्को येथील उर्जा कंपनी) ची मालकी आहे - Druzhba पाइपलाइन, तसेच landlocked Leuna refinery चा मोठा हिस्सा हा TotalEnergies च्या मालकीचा आहे.

  • ग्रीस - ग्रीसच्या सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण कंपनीने सांगितले की, 2021 च्या उत्तरार्धात रशियन क्रूडचा वाटा हा सुमारे 15 टक्के होता. परंतु, फ्रान्सप्रमाणे, हे बदलले जाईल अशी अपेक्षा आहे. या परिस्थितीच ग्रीस सौदी अरेबियाकडून तेल खरेदी करत आहे.

  • इटली - ISAB ही इटलीची सर्वात मोठी रिफायनरी असून ती स्विस बेस्ड लिटास्को SA च्या मालकीची आहे आणि Lukoil (दुसरी रशियन ऊर्जा कंपनी) द्वारे नियंत्रित आहे, जी 4 मार्चपर्यंत सामान्यपणे कार्यरत होती. ही कंपनी विविध क्रूड्सवर प्रक्रिया करते.

  • तुर्की - रशियन क्रूड आणि संबंधित उत्पादनांची खरेदी थांबवण्याबाबत तुर्की सध्या विचार करत नाहीये. त्यांच्याकडून रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांना विरोध केला जात आहे. तुप्रस ही देशातील सर्वात मोठे रिफायनर आहे.

  • पोलंड - PKN Orlen ही देशातील सर्वात मोठे रिफायनर असून त्यांनी सांगितले की, ते पोलंड, लिथुआनिया आणि चेक रिपब्लिकमधील रिफायनरीजसाठी रशियन क्रूड खरेदी करतात. परंतु रशियन तेलाचा पुरवठा बंद झाल्यास इतर मार्ग स्विकारण्यासाठी ते तयार आहेत.

  • नेदरलँड - डच सरकारने किंवा रॉटरडॅम पोर्टने रशियन तेलावर बंदी घातली नाही. रॉटरडॅममधून जाणारे सुमारे 30 टक्के तेल हे रशियन आहे. या बंदरातून दरवर्षी सुमारे 20 दशलक्ष टन रशियन तेल उत्पादने वाहून नेली जातात.

  • हंगेरी - हंगेरियन ऑईल ग्रुप MOL म्हणतो की, त्यांच्याकडून ड्रुझबा पाइपलाइनद्वारे पुरवठा करणे सुरूच आहे. पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांनी रशियन तेल आणि वायूवरील निर्बंधांना वारंवार विरोध केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT