Russia-Ukraine war Volodymyr Zelenskyy warns of further attacks in the coming weeks
Russia-Ukraine war Volodymyr Zelenskyy warns of further attacks in the coming weeks e sakal
ग्लोबल

काही दिवसांत आणखी हल्ले, झेलेन्स्कींचा जनतेला इशारा

सकाळ वृत्तसेवा

किव्ह : युक्रेनच्या पूर्व भागावर हल्ले तीव्र करण्याची योजना रशियाने आखली असल्याने पुढील काही आठवडे अत्यंत महत्त्वाचे असतील, नागरिकांनी अधिक सावध रहावे, असा इशारा युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी जनतेला दिला आहे. आपल्या व्हिडिओ संदेशात झेलेन्स्की यांनी पाश्‍चिमात्य देशांना अधिक सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. झेलेन्स्की म्हणाले की, रशियाने पूर्व भागात सैन्याची जुळवाजुळव केली असून फार मोठ्या प्रमाणात हल्ले करण्याचा त्यांचा इरादा आहे.

आमचे सैनिक त्यांचा निश्‍चितच सामना करतील. मात्र, अशा स्थितीत युरोप आणि अमेरिकेकडून आणखी मदतीची अपेक्षा आहे. रशियाने युद्धभूमीवर मोठ्या संख्येने शस्त्रास्त्रे आणली असून त्याच प्रमाणात अमेरिकेकडून आम्हाला शस्त्रे मिळाली तर मोठी हानी टाळता येईल. नागरिकांनीही पुढील काही आठवडे सावधगिरी बाळगावी.

रशियाने युद्धप्रमुख नेमला

युक्रेनमधील युद्ध आघाडी सांभाळण्यासाठी रशियाने जनरल अलेक्झांडर व्होर्निकोव्ह यांची नेमणुक केली असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. आतापर्यंत रशियाने युद्धासाठी म्हणून कोणत्याही लष्करी अधिकाऱ्याची नेमणुक केली नव्हती. रशियाने २०१५ मध्ये सीरियामध्ये सैन्य तैनात केले होते, त्यावेळी या सैन्याचे नेतृत्व जनरल व्होर्निकोव्ह यांनी केले होते.

युद्धाच्या आघाडीवर

  • युरोपमधून आलेल्या मदतसाहित्य रशियाचे हल्ल्यात उद्‌ध्वस्त

  • युक्रेनला दिलेली एस-३०० क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणाही हल्ल्यात नष्ट

  • युक्रेनमध्ये चर्चमध्ये जखमींवर उपचार

  • युक्रेनला मोठ्या प्रमाणावर शस्त्रांची गरज : जर्मनी

ज्यावेळी लोकांकडे त्यांच्या चुकांबद्दल माफी मागण्याचे आणि वास्तव स्वीकारण्याचे धाडस नसते, त्यावेळी त्यांचे रुपांतर दुष्ट लोकांमध्ये होते. जगाने या दुष्टांकडे दुर्लक्ष केले तर, जगाने आपल्या हुकुमानुसार वागावे, अशी अपेक्षा ते करू लागतात.

- व्होलोदोमिर झेलेन्स्की, अध्यक्ष, युक्रेन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पाऊसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT