sandeep kataria
sandeep kataria 
ग्लोबल

अभिमानास्पद! इतिहासात प्रथमच बाटाच्या आंतरराष्ट्रीय CEO पदी भारतीय व्यक्ती

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : जगभरात अनेक भारतीय लोक आपल्या कार्यकर्तृत्वाने मोठ्या पदावर गेले आहेत. जगात ठिकठिकाणी भारतीयांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्याचप्रमाणे आता बाटा या सुप्रसिद्ध चप्पल कंपनीच्या सीईओ पदी आता एक भारतीय व्यक्ती बसली आहे. बाटा ही चप्पल आणि बुट बनवणारी एक सुप्रसिद्ध कंपनी आहे. आतापर्यंत प्रथमच या कंपनीचे नेतृत्व एका भारतीयाच्या हाती सोपवलं गेलं आहे. बाटाच्या आंतरराष्ट्रीय सीईओ पदी संदीप कटारिया यांची निवड करण्यात आली आहे.

ते आधी बाटा इंडियाचे सीईओ होते. आणि आता त्यांना बढती मिळून बाटाच्या आंतरराष्ट्रीय सीईओ पदी नेमणूक करण्यात आली आहे. बाटाच्या आजवरच्या 126 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एक भारतीय व्यक्ती इतक्या मोठ्या पदावर बसणार आहे. आधीचे सीईओ एलेक्सिस नसार्ड यांच्या जागी संदिप कटारिया यांची ही निवड करण्यात आली आहे. जगात अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांच्या प्रमुखपदी भारतीय व्यक्ती काम पाहते. सत्या नाडेला, सुंदर पिचाई यांच्या बरोबरच आता संदिप कटारिया हे या प्रकारच्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे सीईओ ठरले आहेत. सत्या नाडेला हे मायक्रोसॉफ्टचे तर सुंदर पिचाई हे अल्फाबेटचे सीईओ आहेत. कटारिया यांनी 17 वर्षांहून अधिक काळ युनिलिव्हरमध्ये काम केलं आहे. 

नसार्ड हे बाटाचे पाच वर्षे सीईओ होते. 2017 साली संदिप कटारिया हे बाटाचे सीईओ म्हणून रुजू झाले होते. बाटाचे स्वित्झर्लंडमध्ये मुख्यालय आहे. कटारिया यांच्या नेतृत्वाखाली बाटाने भारतामध्ये दुप्पट नफा कमावला होता. 2019-20 मध्ये बाटा इंडियाचा महसूल 3.053 कोटी रुपये होते तर नेट प्रॉफिट 327 कोटी रुपये होते.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT