ग्लोबल

सौदी अरेबियातील पुरुषांवर बंधनं; पाकिस्तानसह चार देशातील महिलांसोबत लग्नावर बंदी

सकाळन्यूजनेटवर्क

सौदी अरेबियाने(Saudi Arab) आपल्या देशातील पुरुषांना पाकिस्तान, बांग्लादेश, चाड आणि म्यानमारमधील महिलांसोबत लग्न करण्यावर बंदी घातली आहे. पाकिस्तानी वर्तमानपत्र 'डॉन'ने सौदी प्रसारमाध्यमांच्या एका रोपोर्ट्सच्या हवाल्यानं हे वृत्त प्रकाशित केलं आहे. अनौपचारिक आकड्यानुसार, सौदीमध्ये पाकिस्तानसह  चार देशांमधील ५० हजार महिला राहतात. 
 
मक्का पोलीस महानिदेशक मेजर जनरल असफ अल-कुरैशी यांच्या हवाल्यानं तयार करण्यात आलेल्या एका रिपोर्ट्सनुसार,  विदेशी महिलांसोबत लग्न करु इच्छिणाऱ्या सौदी पुरुषांना आता कडक नियमांना सामोरं जावं लागणार आहे.  सौदी पुरुषांना विदेशी महिलांसोबत लग्न करण्यापासून रोखण्यासाठी सौदी सरकारनं  हा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच विदेशी महिलांसोबत लग्न करण्यासाठी सौदी सरकारनं  नवीन नियम आणि अटी लागू करण्यात आले आहेत.  कुरैशी म्हणाले की, विदेशी महिलांसोबत लग्न करु इच्छिणाऱ्या सौदी पुरुषांना आता आधी सौदी सरकारकडू परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच लग्न करण्यासाठी अर्जही द्यावा लागणार आहे, असं वृत्त पाकिस्तानमधील डॉन वर्तमान पत्रात छापण्यात आलं आहे. 

असफ अल-कुरैशी म्हणाले की, घटस्फोटीत पुरुषांना घटस्फोट झाल्यानंतर सहा महिन्यात लग्न करण्यासाठी अर्ज करता येणार नाही. तसेच अर्ज करणाऱ्याचं वय २५ पेक्षा जास्त असायला हवं. रिपोर्ट्सनुसार,  जर अर्ज करणारा पुरुष पहिल्यापासून विवाहित असेल, तर त्याला रुग्णालयातून पत्नीबाबतचा एक रिपोर्ट द्यावा लागेल. यामध्ये पत्नी दिव्यांग आहे किंवा वांझ असल्याचं रिपोर्ट असायला हवा.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

Monsoon Update : मॉन्सून अंदमानमध्ये दाखल! ‘एल निनो’ची तीव्रता कमी होत असल्याचे निरीक्षण

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

SCROLL FOR NEXT