IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

IPL 2024 RR vs KKR Scorecard Update: आयपीएल 2024 स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार होता, मात्र हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.
RR vs KKR | IPL 2024
RR vs KKR | IPL 2024Sakal

IPL 2024 RR vs KKR:

आयपीएल 2024 मधील अखेरचा साखळी सामना गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळवला जाणार होता. मात्र गुवाहाटीत झालेल्या जोरदार पावसामुळे हा सामना साधरण रात्री 11 वाजेपर्यंतही सामन्याला सुरुवात होऊ शकली नाही.

या सामन्यात नाणेफेक झाली, मात्र पुन्हा पाऊस सुरू झाला. त्यामुळे अखेर हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1 पाँइंट देण्यात आला आहे.

हा सामना रद्द झाल्याने राजस्थानचे आता 17 पाँइंट्स झाले. तसेच सनरायझर्स हैदराबादचेही 17 पाँइंट्स आहे. मात्र आता हैदराबादचा नेट रन रेट राजस्थानपेक्षा जास्त असल्याने हैदराबादने पाँइंट्स टेबलमध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे, तर राजस्थान तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त

सेच कोलकाता 20 पाँइंट्सह अव्वल क्रमांकावर कायम आहेत. त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू चौथ्या क्रमांकावर आहेत.

IPL 2024 RR vs KKR Live Score: तब्बल तीन तासांच्या विलंबानंतर राजस्थान-कोलकाता सामन्याला होणार सुरुवात; श्रेयस अय्यरने जिंकला टॉस

गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात आयपीएल 2024 मधील अखेरचा साखळी सामना खेळवला जात आहे.

दरम्यान, या सामन्यावेळी गुवाहाटीत जोरदार पाऊस झाल्याने मोठा व्यत्यय आला. पण अखेर तीन तासांच्या विलंबानंतर 7-7 षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सामन्यासाठी रात्री साडे दहा वाजता नाणेफेक झाली.

कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी कोलकाताने प्लेइंग इलेव्हनमध्ये अनुकूल रॉयला संधी दिली आहे. तसेच राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने सांगितले संघात फारसा बदल नाही, केवळ नांद्रे बर्गरला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संधी दिली जाऊ शकते.

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

आयपीएल 2024 स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स होणार आहे. पण गुवाहाटीमध्ये पाऊस पडत असल्याने हा सामना उशीरा सुरू होण्याची शक्यता आहे. या सामन्यात नाणेफेकीलाही उशीर झाला आहे.

Rajasthan Royals vs Kolkata Knight Riders: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स होणार आहे. हा सामना राजस्थानने घरचे मैदान म्हणून स्वीकारलेल्या बरसाबारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

राजस्थान आणि कोलकाता या दोन्ही संघांनी प्लेऑफमधील प्रवेश आधीच निश्चित केला आहे. तसेच कोलकाताने 9 सामने जिंकत प्लेऑफमधील पहिले स्थानही पक्के केले आहे.

मात्र, राजस्थानला गेल्या 4 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे ते आता प्लेऑफमधील सामने खेळण्यापूर्वी विजयी मार्गावर परतण्यासाठी उत्सुक असतील. याशिवाय जर हा सामना जिंकला, तर राजस्थान स्वत:च्या कामगिरीच्या जोरावर दुसऱ्या क्रमांकावरील स्थान पक्के करेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com