Shocking News
Shocking News esakal
ग्लोबल

Shocking News : शतकाच्या अंतापर्यंत कमी होणार 200 कोटींची लोकसंख्या, अभ्यासातून समोर...

धनश्री भावसार-बगाडे

Population Rate Study : मागच्या वर्षी २०२२ नोव्हेंबर मध्ये झालेल्या चाचणीनुसार पृथ्वीवरची लोकसंख्या ८०० कोटी पार झाली आहे. २०५० पर्यंत ही ९०० कोटी होणार. पण त्यानंतर मात्र लोकसंख्या वेगात कमी होणार आहे. कारण लोकांना श्वास घ्यायलाही त्रास होईल, असं नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून समोर आलं आहे.

लोकसंख्या वाढवण्यात माणूस एक्सपर्ट आहे. १०० ते २०० कोटी लोकसंख्या व्हायला १२५ वर्ष लागले होते. पण मागील १५ नोव्हेंबरपर्यंत पृथ्वीवर ८०० कोटी लोकसंख्या झाली आहे. म्हणजे ७००-८०० कोटी लोकसंख्या व्हायला फक्त १२ वर्ष लागले. पण आता २०५० पर्यंत ९०० कोटी होण्यासाठी २७ वर्ष लागत आहेत. याचाच अर्थ माणसाची प्रजनन क्षमता कमी होत आहे.

UN DESA च्या वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉसपेक्ट्स 2022 अहवालानुसार सांगण्यात आलं होतं की, ९०० कोटी लोकसंख्या २०३७ पर्यंत पूर्ण होईल. २०५८मध्ये १००० कोटीला पार करेल. पण असं होताना दिसत नाही आहे. लोकसंख्या वाढणे किंवा कमी होणे याचे आपले असे काही फायदे आणि तोटे आहेत. कमी लोकसंख्येला कमी उर्जा लागते.

जेवढी लोकसंख्या जास्त तेवढ्या संसाधनांची आवश्यकता जास्त. आर्थिक असंतूलन होतं. त्यामुळे भविष्यात असे काही नियम बनवणं आवश्यक होईल ज्यामुळे समाज, आर्थिक स्थिती आणि पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त असेल. इथे ज्या अभ्यासाविषयी सांगण्यात येत आहे तो फार सखोल करण्यात आला आहे.

अनेक देशांनी ओलांडली लोकसंख्येची सर्वोच्च पातळी

Earth4All चे मॉडलर आणि शास्त्रज्ञ जोर्जेन रँडर्स यांनी सांगितलं की, माणसाच्या सर्वात मोठ्या लग्झरीयस गोष्टींमध्ये कार्बन आणि बायोस्फेयरचा वापर होतो. जिथेही लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात वाढते तिथे पर्यावरणाचा स्तर फार ढासळलेला असतो. याच जागा लोकसंख्या वाढण्यापूर्वी पर्यावरणाच्या उच्चस्तरावर होतं.

अफ्रिकेत वेगात वाढत आहे लोकसंख्या

या अभ्यासासाठी १० देशांची निवड करण्यात आली होती. चीनपासून अमेरिका, अफ्रिका येथील विविध देशांचा यात समावेश आहे. या अफ्रिकी देश जसे, अंगोला, नायगर, काँगो, नायजेरियामध्ये लोकसंख्या वाढण्याचा दर सर्वाधिक आहे. आशियाई देशांत लोकसंख्या वाढीत अफगाणीस्तान सर्वात पुढे आहे. वैज्ञानिकांनी या शतकात येणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेतला.

शतकाच्या शेवटापर्यंत ६०० ते ७६० कोटी असेल लोकसंख्या

याच्या मोजणीनुसार या शतकाच्या मध्यापर्यंत पृथ्वीवर लोकसंख्या ८८० कोटी होईल पण नंतर ही २१०० पर्यंत कमी होऊन ७३० कोटींपर्यंत होईल.

याचं कारण वैश्विक असंतुलन, इकॉलॉजिकल फुटप्रिंट, वाईल्ड लाइफ लुप्त होणे याशिवाय पुढे जाऊन आर्थिक स्थिती लोकसंख्येला अजून कमी करेल. सगळ्यात चांगली स्थिती जाएंट लीप ला मानली गेली. २०४० पर्यंत लोकसंख्या ८५० कोटी होईल. पण शकताच्या अंतापर्यंत ती कमी होऊन ६०० कोटी होईल. एकूणच लोकसंख्या कमी होण्याची सगळ्याच मोठे कारण आर्थिक असंतूलन आणि जलवायू परीवर्तन हे असणार आहे.

UN DESA च्या अहवालाचा दावा

मागच्या काही दशकांपासून लोकसंख्या वाढीचा दर घटला आहे. पण तरीही २०३७ पर्यंत ९०० तर २०५८ पर्यंत १००० कोटी लोकसंख्या होईल. हा अंदाज UN DESA च्या वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉसपेक्ट्स 2022 च्या अहवालात लावण्यात आला आहे.

वाढत्या लोकसंख्येनुसार माणसांना हवी पावणे दोन भाग पृथ्वी

WWF आणि ग्लोबल फुटप्रिंट नेटवर्कच्या नुसार ज्या गतीने लोकसंख्या वाढते आहे त्यानुसार जमीन कमी पडून माणसाच्या गरजा भागवण्यासाठी अजून पावणे दोन भाग पृथ्वी अतिरीक्त लागेल. म्हणजे आता आहे त्यापेक्षा ७५ टक्के जास्त वाढ होणे आवश्यक आहे.

या ८ देशात सर्वाधिक वाढेल लोकसंख्या

संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार २०५० पर्यंत काँगो, मिस्र, इथियोपिया, भारत, नायजेरीया, पाकिस्तान, फिलिपींस, तंजानिया या ८ देशात सर्वाधिक लोकसंख्या वाढेल. २०५० पर्यंत जी लोकसंख्या वाढ होणार आहे ती निम्म्यापेक्षा जास्त अफ्रिकी देशांत होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT