STSS Japan esakal
ग्लोबल

STSS Japan: मांस खाणाऱ्या जीवाणूंमुळे जपानमध्ये दहशत; देशात आढळले ९७७ रुग्ण, नेमका प्रकार काय?

या जीवाणुमुळे जपान आणि संपूर्ण जग धोक्यात आले आहे, कोरोनापेक्षा भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागणार, जगाला दुसऱ्या मोठ्या साथीला तोंड द्यावे लागणार, असे अनेक दावे प्रसारमाध्यमांमधून केलेले आहेत. हा जिवाणू आणि त्याची लागण झाल्यानंतर होणारे परिणाम हे गंभीर आहेत, याबद्दल काहीच वाद नाही, पण ज्या पद्धतीने लोकांमध्ये भीती पसरविली जात...

सकाळ वृत्तसेवा

टोकियोः कोरोना साथीच्या कटू आठवणीतून जग सावरले असतानाच जपानमध्ये मांस खाणाऱ्या जीवाणूंच्या बातम्यांमुळे पुन्हा भीती निर्माण होत आहे. स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम (एसटीएसएस) असे या जीवाणुमुळे होणाऱ्या आजाराचे नाव असून जपानमध्ये या आजाराचे ९७७ रुग्ण आढळले आहेत.

या जीवाणुमुळे जपान आणि संपूर्ण जग धोक्यात आले आहे, कोरोनापेक्षा भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागणार, जगाला दुसऱ्या मोठ्या साथीला तोंड द्यावे लागणार, असे अनेक दावे प्रसारमाध्यमांमधून केलेले आहेत. हा जिवाणू आणि त्याची लागण झाल्यानंतर होणारे परिणाम हे गंभीर आहेत, याबद्दल काहीच वाद नाही, पण ज्या पद्धतीने लोकांमध्ये भीती पसरविली जात आहे, ते चुकीचे आहे, असे जपानमधील भारतीय समुदायाचे मत आहे.

समुदायाच्या म्हणण्यानुसार, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या आजाराची लागण झाल्यानंतर ४८ तासांत त्या व्यक्तीचा मृत्यू होतोच होतो, हे सांगण्यावर प्रसारमाध्यमे भर देत आहेत. पण सत्य परिस्थिती थोडी वेगळी आहे. गेल्या वर्षी जपानमध्ये एकूण ९४१ लोकांना या आजाराची लागण झाली. त्यापैकी ९७ जणांचा मृत्यू झाला तर यावर्षी आतापर्यंत ९७७ लोकांना संसर्ग झाला असून ७७ लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वसाधारणपणे, या जीवाणुचा संसर्ग होण्याचा धोका खूप कमी असतो. परंतु मुले, वयस्क आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना याचा संसर्ग होऊ शकतो.

जपानला नैसर्गिक संकटे नवीन नाहीत. वेळोवेळी होणारे भूकंप, वादळी वारे यांना येथील लोक नेहमी तोंड देतात आणि कदाचित त्यामुळेच इतर नवीन कुठल्या संकटाला सामोरे जाण्यासाठी ते वेळेआधी तयार, सतर्क असतात. आपल्याकडे जशी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण ही शहरे एकमेकांजवळ आहेत, त्याप्रमाणे जपानची राजधानी टोकियो शहरालगत योकोहामा, साईतामा, चिबा, सागामिहारा ही चिकटून असलेली शहरे आहेत. टोकियो आणि या शहरांची एकत्र लोकसंख्या सुमारे ३ कोटी ७० लाख आहे.

एवढी दाट लोकसंख्या असूनसुद्धा संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले होते तेव्हा येथे आणि जपानच्या इतर भागांतही रेल्वे, शाळा, कार्यालये, मॉल, दुकाने कधीच बंद नव्हती. लॉकडाऊन हा प्रकारच जपानमध्ये लागू केला नव्हता. हे सगळे शक्य झाले होते, ते जपानी नागरिकांच्या स्वच्छतेच्या सवयीमुळे, त्यांच्या सतर्कतेमुळे, वेळोवेळी सरकारने घालून दिलेले नियम कटाक्षाने पाळल्यामुळे आणि सरकारने घेतलेल्या योग्य निर्णयांमुळे! अशीच परिस्थिती या नवीन जिवाणुंबद्दलही आहे. इथे सर्वजण शक्य तेवढी काळजी घेत आहेत. आजाराची लक्षणे असल्यास दवाखान्यात जाणे, मास्क वापरणे, अंगावर जखमा असतील तर त्यांची व्यवस्थित काळजी घेणे, अशा सूचनांचे सर्वजण पालन करत आहेत.

जपान सामना करण्यास सक्षम

जपान सरकार, यंत्रणा जपानी नागरिकांबरोबर येथे राहणाऱ्या इतर देशांच्या नागरिकांचीसुद्धा तेवढीच काळजी घेतात. शिवाय जपानमधील भारतीय दूतावाससुद्धा या देशातील भारतीयांना वेळोवेळी मदत करण्यासाठी उपलब्ध असतो. जपानमध्ये सुमारे ५० हजार भारतीय राहतात. तशी ही जपानमधील भारतीयांची पहिलीच पिढी आहे. अशा बातम्या ऐकून, पाहून भारतातील आमचे पालक खूप घाबरतात. विनाकारण मानसिक तणावाखाली येतात. भारतातील प्रसारमाध्यमांनी अशा बातम्या जबाबदारीने प्रसारित कराव्यात आणि सोबत जपान सरकार, येथील नागरिक अशा संकटांना तोंड देण्यास कसे सक्षम आहे, हेसुद्धा सांगावे, जेणेकरून भारतात राहणाऱ्या आमच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही, अशी विनंती जपानमधील भारतीय समुदायाने प्रसारमाध्यमांना केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT