

Severe Hailstorm in Pune Causes Panic; Eight Tree Fall Cases Reported
sakal
पुणे : एप्रिलच्या पहिल्याच दिवशी वाढलेल्या उकाड्यात पावसाने पुण्याला अक्षरशः झोडपून काढले. मध्यवर्ती भागासह उपनगरांत जोरदार पावसाने दाणादाण उडवली. खराडी, कात्रज परिसरात गारांच्या पावसाने पुणेकरांची तारांबळ उडाली. सकाळपासून जाणवणारा उन्हाचा कडाका, दुपारनंतर ढगाळलेले वातावरण आणि सायंकाळी धडकलेल्या जोरदार पावसामुळे पुणेकरांना तारेवरची कसरत करावी लागली.