Tesla
Tesla 
ग्लोबल

अमेरिकेतील हि कंपनी आजपासून सुरू; कोणती ते वाचा सविस्तर

पीटीआय

न्यूयॉर्क - अमेरिकेतील तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील आघाडीचे नवउद्योजक एलॉन मस्क यांनी थेट लॉकडाउनच्या नियमांना आव्हान देताना उद्यापासून (ता. १३) टेस्ला कंपनीतील उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आमचा हा निर्णय अल्मेड काउंटीच्या कायद्याविरोधात असून उद्या (ता. १४) जर पोलिसांनी आमच्या कर्मचाऱ्यांना अटक केली तर मी देखील त्या रांगेत उभा राहीन असा निर्धार त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.

दरम्यान, कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या अमेरिकेत लॉकडाउन करण्यात आले असून याचा मोठा फटका औद्योगिक क्षेत्राला बसला आहे. मस्क यांच्या टेस्लाप्रमाणेच अमेरिकेतील अनेक बड्या  कंपन्या सध्या बंद आहेत.  मागील वर्षीच अमेरिकेच्या सिक्योरिटीज आणि एक्सचेंज कमिशनसोबतची कायदेशीर लढाई जिंकल्यानंतर मस्क यांनी पुन्हा अमेरिकेतील कायदा व्यस्थेला आव्हान दिले आहे.

कॅलिफोर्नियातील अल्मेडा काउंटीच्या नियमानाच  मस्क यांनी आव्हान दिले असून यासाठी त्यांनी न्यायालयाचे दार देखील ठोठावले आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या संसर्गाने अमेरिकेत उसळी घेतल्यानंतर सरकारने लॉकडाउनचा मार्ग स्वीकारला होता.

मुख्यालय
पावलोअल्टो, कॅलिफोर्निया अमेरिका 
वाहनांचे उत्पादन
३ लाख ६७ हजार ५०० (२०१९)
बाजारातील भागभांडवल
६६ अब्ज डॉलर 

किसमे कितना है दम (रोखे बाजारातील किंमत)
टेस्ला - ८८.२ 
फोर्ड - ३६.६
जनरल मोटर्स - ४९. ४
आकडे अब्ज डॉलरमध्ये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT