ग्लोबल

अवघ्या 20 सेकंदांसाठी जपानी रेल्वेचा माफीनामा

वृत्तसंस्था

नियोजित वेळेपूर्वी गाडी सुटल्याने व्यक्त केली दिलगिरी

टोकियो: जपानमधील टोकियो आणि उत्तरेकडील उपनगरांना जोडणाऱ्या मार्गावर धावणारी रेल्वे वीस सेकंद लवकर सुटल्यामुळे रेल्वे सेवा पुरविणाऱ्या कंपनीने प्रवाशांची माफी मागितली आहे. वेळ पाळण्यातील काटेकोरपणा आणि विनयशीलपणे वागण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जपानमधील ही घटना आहे.

जपानमधील बुलेट ट्रेनसह इतर सर्व रेल्वे सेवांमध्ये वेळेची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. याबाबतीत जपानची रेल्वे सेवा जगविख्यात आहे. मोठ्या संख्येने असलेल्या प्रवाशांना सेवा देण्यासाठी राजधानी टोकियोत अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने रेल्वे धावतात. त्यामुळे या गाड्यांना वेळ पाळणे आवश्‍यक ठरते, कारण काही मिनिटे जरी उशीर झाला तरी पुढील रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडून पडू शकते. जपानी नागरिक वेळ पाळण्याबाबत प्रचंड आग्रही असतो.

टोकियोला एका उपनगराशी जोडणाऱ्या मार्गावर धावणारी रेल्वे गाडी मिनामी नागारेयामा स्थानकातून 20 सेकंद अगोदर सुटली होती. ही रेल्वे गाडी नऊ वाजून 44 मिनिटे व 40 सेकंदांनी सुटणे अपेक्षित होते. मात्र, ती 20 सेकंद लवकर म्हणजे नऊ वाजून 44 मिनिटे व 20 सेकंदांनी सुटली. त्यामुळे गाडी 20 सेकंद लवकर सुटली याबाबत रेल्वे सेवा पुरविणाऱ्या कंपनीने प्रवाशांची बिनशर्त माफी मागितली आहे. ""रेल्वे गाडी 20 सेकंदांनी लवकर सुटल्यामुळे आमच्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला. या प्रकाराबद्दल प्रवाशांची आम्ही माफी मागतो,'' अशा शब्दांत संबंधित कंपनीने माफीनामा सादर केला आहे. विशेष म्हणजे याबाबत कोणीही तक्रार केली नव्हती.

भारतीयांसाठी धक्कादायक घटना
सुरक्षेसंदर्भातील ठरवून दिलेल्या प्रक्रियेचे पालन न केल्यामुळे गाडी 20 सेकंद लवकर सुटली. सुरक्षेबाबतचे नियम पाळण्यावर आमचा कटाक्ष असतो. त्यामुळे या प्रकाराबाबत माफी मागण्यात आली असल्याचे जपानी कंपनीच्या प्रवक्‍त्याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. रेल्वे गाडी कधीही वेळेवर न येण्याची खात्री असलेल्या भारतातील प्रवाशांना तर या माफीनाम्यामुळे धक्काच बसला. भारतीयांनी जपानकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियात अनेकांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT