Keir Starmer Rishi Sunak 
ग्लोबल

UK General Election Exit Polls: ब्रिटनमध्ये सत्ताबदल! लेबर पार्टी प्रचंड विजयाच्या दिशेने, ऋषी सुनक यांना धक्का

UK General Election Conservative Party VS Labour part Exit Polls: ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पार्टीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कीर स्टर्मर यांच्या नेतृत्त्वातील लेबर पार्टी मोठी मुसंडी मारण्याची शक्यता आहे.

कार्तिक पुजारी

लंडन- ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सत्ताबदलाचे संकेत मिळत आहेत. एक्झिट पोलमध्ये लेबर पार्टीला प्रचंड बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सत्तेत असलेल्या ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पार्टीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कीर स्टर्मर यांच्या नेतृत्त्वातील लेबर पार्टी मोठी मुसंडी मारण्याची शक्यता आहे. लेबर पार्टी प्रचंड बहुमत मिळवेत असा एक्झिट पोलचा अंदाज आहे.

एक्झिट पोलमध्ये लेबर पार्टी ४१० जागा मिळवेत असं सांगण्यात आलंय, तर कंझर्व्हेटिव्ह पार्टीला फक्त १३१ जागांवर समाधान मानावे लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये एकूण ६५० जागांसाठी मतदान झाले. बहुमत गाठण्यासाठी पक्षांकडे ३२६ जागा असणे आवश्यक आहे. त्यामुळे लेबर पार्टी सहज बहुमत मिळवत असल्याचं दिसतंय. बीबीसीने यासंदर्भातील रिपोर्ट दिला आहे.

ऋषी सुनक यांची कंझर्व्हेटिव्ह पार्टी गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत आहे. पण, यावेळी त्यांची सत्ता जाण्याची चिन्ह आहेत. अर्थव्यवस्थेतील अस्थिरता, महागाई, स्थलांतर असे काही मुद्दे महत्त्वाचे ठरले. या मुद्द्यांमुळे कंझर्व्हेटिव्ह पार्टीला सत्ता गमावावी लागण्याची शक्यता आहे. याशिवाय ऋषी सुनक यांच्या विरोधात पक्षातून अंतर्गत गट तयार झाला होता. त्यामुळे सुनक यांच्यासमोर दुहेरी आव्हान निर्माण झाले होते.

एक्झिट पोलनुसार, लिबरल डेमोक्रेट्स (Liberal Democrats) पक्षाला ६१ जागा मिळण्याचा अंदाज आहे. रिफॉर्म पार्टीला १४ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. स्कॉटिश नॅशनल पार्टीला १० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, अपक्षांना २५ जागा मिळू शकतील. याचा अर्थ इतर पक्षांना देखील चांगल्या जागा मिळत आहेत.

यूकेमध्ये ४ जुलैला सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली होती, त्यानंतर १० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती. त्यानंतर लगेच एक्झिट पोल समोर आले आहेत. एक्झिट पोलमध्ये लेबर पार्टीला बहुमत मिळत असल्याचा अंदाज व्यक्त केला असला तरी खरे चित्र आणखी काही तासांत स्पष्ट होईल. यूकेमध्ये मतदान बॅलेट पेपरवर होत असतं. त्यामुळे मतमोजणीला वेळ लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi case: सोनिया गांधींच्या अडचणी वाढणार? दिल्लीच्या कोर्टात आता नवीन तक्रार दाखल!

Onion : मुंबईत २४ रुपये किलोने मिळणार कांदा! केंद्र सरकारची सवलत योजना; फिरत्या वाहनाद्वारे विक्री

Nashik News : छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ

ODI World Cup सुरू होण्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार क्रिकेटर झाली संघाबाहेर; बदली खेळाडूचीही घोषणा

Manoj Jarange: विखे पाटील मनोज जरांगेंच्या भेटीला; भुजबळांना म्हणाले, चर्चेत का सहभागी झाला नाहीत?

SCROLL FOR NEXT