jail file photo
ग्लोबल

या 'तुरुंगात' मिळते दारु! पैसे खर्च करून तुरुंगवास भोगतात कैदी

सुस्मिता वडतिले

जेलमध्ये कॉकटेल बार सुरू झाला असून या 'जेल' मध्ये जाण्यासाठी कैद्यांमध्ये उत्साह आहे.

पुणे: एखादा कैदी गुन्हा केला तर त्या गुन्हेगारांना तुरूंगात ठेवले जाते, जेथे त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल शिक्षा भोगावी लागते. परंतु लंडन, इंग्लंडमध्ये (England Jail Cocktail Bar) इंग्लंड जेल कॉकटेल बार अशी जेल आहे, जिथे तुरुगांत बंद झाल्यानंतर, ड्रिंक म्हणजेच दारू दिली जाते. चला तर मग या 'अनोख्या कारागृहाबद्दल' जाणून घेवूयात.

सध्या ही अनोखी जेल लंडनमध्ये अॅडवेंचर आणि प्रवासाची आवड असणा-यांसाठी चर्चेचा विषय आहे. जेलमध्ये कॉकटेल बार सुरू झाला असून या 'जेल' मध्ये जाण्यासाठी कैद्यांमध्ये उत्साह आहे.

या जेलचे नाव Alcotraz Cell Block Two One Two आहे. पण ही जागा जेल नाही तर एक बार आहे. लोकांना वेगळा एक्सपीरियंस (अनुभव) देण्यासाठी येथे एक अनोखी थीम ठेवली गेली आहे. या थीमसह या कॉकटेल बारमध्ये प्रवेश केल्याने तेथे जेलसारखे वातावरण असल्याचे जाणवते.

येथे येणार्‍या लोकांना कैद्यांप्रमाणे नारिंगी रंगाचे जंपसूट घालण्यास दिले जाते. यानंतर, तो येथे तुरूंग सारख्या कोठडीत बसतो. तसेच येथे येणार्‍या लोकांना अल्कोहोल स्मगलिंगचा (Alcohol Smuggling) खेळ खेळावा लागतो.

स्मगलिंगचा खेळ जिंकल्यानंतर, त्यांच्या जेलमध्ये असलेल्या सोबत्याबरोबर बसून लोकांना त्यांच्या आवडत्या ड्रिंक पिण्याचा आनंद घेता येतो. या कॉकटेल बारवर आल्यानंतर तुम्हाला ड्रिंक्सचा मेन्यू मिळत नाही. कारण ते 'जेल' आहे, अशा परिस्थितीत आपल्याला ड्रिंक्स स्मगलिंग करावी लागते.

बारच्या अधिकृत वेबसाइटवर बर्‍याच मनोरंजक माहिती देण्यात आल्या आहेत. या बारमध्ये येण्यासाठी 35.99 पौंड म्हणजे सुमारे 3600 रुपये खर्च करावे लागतात. या बारचे तिकिट वेबसाइटवरूनच बुक करता येते.

इंग्लंडमध्ये यावेळी कोरोनाव्हायरस कमी झाल्यामुळे लॉकडाउनवरील निर्बंध हटविले गेले आहेत, म्हणूनच लोक या 'जेल' जागेचा खूप आनंद घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Megablock: रेल्वेमार्गावर तब्बल ७८ दिवसांचा ब्लॉक, लोकल वाहतूक ठप्प होणार; प्रवाशांचे हाल!

म्हणून अमृता खानविलकरसोबतचे फोटो शेअर करत नाही... सई ताम्हणकरने सांगितलं कारण; म्हणाली- मैत्रीमध्ये...

हातात पुजेची टोपली अन् मदतीसाठी महिलांच्या किंचाळ्या...वेंकटेश्वर स्वामी मंदिरातील चेंगराचेंगरीचा थरारक VIDEO समोर

School Students Assault: भयंकर! इंग्लिश मीडियम स्कूलमधील २२ विद्यार्थ्यांवर अत्याचार, मुख्याध्यापकासह तिघांना अटक

MNS-MVA Morcha: लोकशाहीमध्ये संविधानाने दिलेला अधिकार जतन करण्याची वेळ आली, शरद पवारांचे आवाहन

SCROLL FOR NEXT