shri thanedar 
ग्लोबल

US Election - जमिनीवर झोपून दिवस काढले आता बदल घडवेन; मराठमोळ्या ठाणेदारांचा निर्धार

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन - अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या (US Election) लढतीत डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडेन (Joe Biden) हे आघाडीवर असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President Donald Trump) पिछाडीवर आहेत. या निवडणूकीत अनेक भारतीय वंशाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. यामध्ये मराठमोळ्या श्री ठाणेदार (Shri Thanedar) यांचाही समावेश आहे. त्यांनी मिशिगनमध्ये (MIchiegan) प्रतिस्पर्धी उमेदवाराला धूळ चारत 93 टक्के मते मिळवली आहेत. 

भारतीय वंशाचे श्री ठाणेदार हे मिशिगन राज्यातून आमदार झाले आहेत. त्यांनी एकूण मतांपैकी 93 टक्के मते मिळवली. त्यांच्याविरोधात सहा उमेदवार होते. त्यांना पराभूत करून ठाणेदारांनी दणदणीत विजय मिळवला. 

ठाणेदार यांचा जन्म कर्नाटकातील बेळगाव येथे गरीब कुटुंबात झाला होता. लहानपणी कुटुंबाला आधार देण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या होत्या. त्यांनी मुंबई विद्यापीठातून वयाच्या १८ व्या वर्षी रसायनशास्त्रातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. यानंतर ते १९७९ मध्ये अमेरिकेला स्थलांतरीत झाले. १९८८ पासून ते अमेरिकेचे नागरिक आहेत.

ठाणेदार यांनी २०१८ मध्ये प्रायमरीची निवडणूक लढविली होती. मात्र, यात त्यांचा पराभव झाला होता. त्यावेळी त्यांनी दूरचित्रवाणीवर ‘श्री फॉर वुई’ ही जाहीरात प्रचंड प्रमाणात केल्याने त्यांचे नाव चर्चेत आले होते. मात्र, त्यावेळी एक कोटी डॉलर खर्च करूनही त्यांना विजय मिळाला नव्हता. यानंतर ते डेट्रॉइट येथे स्थायिक झाले आणि येथे त्यांनी विजय मिळविला.

गेल्या अनेक वर्षांत काहीही बदल झालेला नाही. हा बदल मी घडवेन. अनेक लोक वंचित आहेत. मीदेखील जमिनीवर झोपून दिवस काढले आहेत. गरीबीचे दु:ख मी जाणतो.
- श्री ठाणेदार

कोरोनाचं संकट जगावर ओढावलं असून याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला. या काळात त्यांनी मिशिगनमध्ये सॅनिटायझर, मास्क यांचे वाटप केले. जनतेला या संकटकाळात आधार देण्याचं काम त्यांनी केलं. आता निवडणून आल्यानंतर राज्यातील गुन्हेगारी, बेरोजगारी, गरिबी कमी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

डेमोक्रेटिक पक्षाचे प्रतिनिधी असलेले भारतीय वंशाचे चार खासदार पुन्हा निवडून आले आहेत. यामध्ये अॅमी बेरा, प्रमिला जयपाल, रो खन्ना आणि राजा कृष्णमृर्ती यांचा समावेश आहे. अमेरिकेत भारतीयांचा प्रभाव वाढत असल्याचंच यातून दिसत आहे.

अमेरिकेत जवळपास 18 लाख भारतीय मतदार आहेत. ते अमेरिकेतील फ्लोरिडा, जॉर्जिया, मिशिगन, उत्तर कॅरोलिना, पेनसिल्वानिया आणि टेक्सासमध्ये सर्वाधिक आहेत. या चार खासदारांपैकी अॅमी बेरा या सलग पाचव्यांदा तर रो खन्ना आणि प्रमिला जयपाल तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET paper leak: आंदोलनादरम्यान कोणतीही 'नारेबाजी' चालणार नाही! दिल्ली आंदोलनात केवळ 'या' चार घोषणा देण्याचं 'सीजेपी'कडून आवाहन

जंतर मंतरच्या आंदोलकांची भूक भागवतायत 'अदृश्य हात'; देशभरातून पिझ्झा, बर्गरसह जेवणाची ऑर्डर

Live Updates Marathi : पुण्यातील काँग्रेस भवनाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

Vaibhav Sooryavanshi : ३ सामने खेळवून बाकावर बसवले, गंभीरच्या निर्णयावर प्रथमच व्यक्त झाला वैभव... म्हणाला, प्रशिक्षक मला..

Temghar Dam: टेमघर धरण ५० टक्के भरले; पुणेकरांसाठी महिनाभराच्या पाण्याचा दिलासा

SCROLL FOR NEXT