veteran international journalist robert fisk passes away
veteran international journalist robert fisk passes away 
ग्लोबल

लादेनची मुलाखत घेणारे ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय पत्रकार रॉबर्ट फिस्क यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा

डब्लिन (आयर्लंड) -  अल-कायदा या दहशतवादी संस्थेचा संस्थापक ओसामा बिन लादेन याची मुलाखत घेणारे व पश्‍चिम आशियातील महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे वार्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार रॉबर्ट फिस्क (वय ७४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. फिस्क यांची बरे वाटत नसल्याने त्यांना शुक्रवारी (ता. ३०) डब्लिन येथील रुग्णालयात दाखल केले होते. रविवारी (ता.१) त्यांचे निधन झाले, अशी माहिती आयरिश टाईम्स’ने दिली. 

फिस्क यांनी १९७०मध्ये पत्रकारितेला सुरुवात केली. पश्‍चिम आशियावरील बातम्यांबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले होते. पण अमेरिका, इस्राईल आणि पश्‍चिमेकडील परराष्ट्र धोरणावर त्यांनी केलेल्या टीकेबद्दल वादही झाले. ब्रिटनमधील दैनिकांसाठी फिस्क यांनी बाल्कन देश, पश्‍चिम आशिया आणि उत्तर आफ्रिकेतील युद्धाचे वार्तांकनही केले होते. ‘ब्रिटनमधील सर्वांत प्रसिद्ध विदेशी पत्रकार’, असा त्यांचा गौरव न्यूयॉर्क टाईम्सने २००५मध्ये केला होता.

फिस्क यांचा जन्म मेडस्टोनमधील केन्ट येथे १९४६मध्ये झाला. त्यांनी नंतर आयर्लंडचे नागरिकत्व स्वीकारले होते. आयरिश अध्यक्ष मायकेल डी हिगिन्स यांनी फिस्क यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. ‘द ग्रेट वॉर ऑफ सिव्हिलायझेशन- द कॉन्क्वेस्ट ऑफ द मिडल इस्ट’ या पुस्तकात त्यांनी अमेरिका, ब्रिटन आणि इस्राईलच्या धोरणांवर टीका केली आहे.

लाजाळू ओसामा
फिस्क यांनी ‘द इंडिपेंडट’साठी १९९०च्या दशकात ओसामा बिन लादेनची तीन वेळा मुलाखत घेतली होती. १९९३ मधील पहिल्या मुलाखतीत ओसामा हा लाजाळू असल्याचे व मुहिदिनांसाठी लढणारा पहाडी योद्ध्याच्या रूपात तो दिसत असल्याचे वर्णन त्यांनी केले होते. लादेनने अमेरिकेतील ट्विन टॉवरवर ११ सप्टेंबर रोजी केल्यानंतर फिस्क यांनी पुढील दोन दशके पश्‍चिम आशियातील संघर्ष हा त्यांच्या बातमीदारीचा विषय होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारताच्या प्लेइंग -11 मध्ये पंत की सॅमसन? गावसकर म्हणाले, 'यष्टीरक्षक म्हणून तुलना केली तर...'

Exit Polls: अमित शाहांचं 'मिशन १२०' काय आहे? पक्षाला बळकटी देण्यासाठी भाजपच्या चाणक्याची रणनिती; एक्झिट पोलमधून मिळाले संकेत

Porsche Crash Case: अपघातानंतर ब्लड सॅम्पल बदलण्याचा सल्ला कोणी दिला? पुणे पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईचा खुलासा

T20 World Cup: न्युयॉर्कमध्ये टीम इंडियाच्या सुरक्षेबाबत हयगय नाही! विराटभोवतीही दिसला सुरक्षारक्षकांचा घेरा, Video Viral

Kolhapur Crime News: मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा कारागृहात हत्या, कैद्यांच्या दोन गटात मारहाणीवेळी घडली घटना

SCROLL FOR NEXT