ग्लोबल

पाळीव श्वानाला वाचवण्यासाठी तरुणीने घेतला अस्वलासोबत पंगा

शर्वरी जोशी

जगात श्वानप्रेमींची कमी नाही. आजही अनेक घरांमध्ये श्वानाला कुटुंबातील एक सदस्य असल्याप्रमाणे वागवलं जातं. त्यामुळे वेळप्रसंगी श्वानाला (dog) काही झालं तर कुटुंबातील प्रत्येक जण अस्वस्थ होतो. सध्या सोशल मीडियावर एका श्वानप्रेमी मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आपल्या श्वानांना वाचवण्यासाठी या मुलीने थेट अस्वलासोबत पंगा घेतला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाला आहे. (video-shows-teen-girl-shoving-huge-bear-over-fence-to-save-her-dogs)

सोशल मीडियावर चर्चेत आलेला प्रकार दक्षिण कॅलिफोर्निया येथे घडला आहे. एका घराच्या मागे असलेल्या भिंतीवरुन एक अस्वल त्या घरात येण्याचा प्रयत्न करत होतं. हे पाहून घरातील पाळीव श्वान त्याच्या अंगावर भुंकू लागले. विशेष म्हणजे अस्वल व श्वान यांच्यात झटापट होणार हे लक्षात आल्यावर एक १७ वर्षीय मुलगी घरातून बाहेर आली आणि तिने थेट या बलाढ्य अस्वलाला भिंतीवरुन खालती ढकलून दिलं.

"ज्यावेळी मी त्या प्राण्याला धक्का दिला त्यावेळी ते अस्वल आहे याची कल्पनाही माझ्या डोक्यात आली नव्हती. मला फक्त माझे श्वान दिसत होते. आणि, हा प्राणी माझ्या श्वानांना घेऊन जाईल ही एकच भीती माझ्या मनात होती. माझ्या श्वानांना वाचवण्यासाठी मी त्याल अस्वलाला धक्का दिला", असं या तरुणीने एका मुलाखतीत सांगितलं.

दरम्यान, अस्वल भिंतीवरुन खाली पडल्यानंतर या तरुणीने पटकन आपल्या श्वानांना घरात नेलं. हा व्हिडीओ २४ सेकंदाचा असून सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. आतापर्यंत त्याला २ लाख १७ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. तर, लाखोच्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update :उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा

SCROLL FOR NEXT