Vladimir Putin
Vladimir Putin Sakal
ग्लोबल

व्लादिमीर पुतीन यांची नजर युरोपवर

सकाळ वृत्तसेवा

किव्ह : ‘रशियाचे हल्ले युक्रेनमध्ये होत असले तरी अध्यक्ष पुतीन यांची नजर संपूर्ण युरोपवर आहे. त्यामुळे युरोपमधील लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी युक्रेनवरील आक्रमणाला पायबंद घालणे अत्यंत आवश्‍यक आहे,’ असा इशारा युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी आज युरोपला दिला. संभाव्य हल्ल्याच्या भीतीने युक्रेनच्या उत्तर भागातून अनेक नागरिक पलायन करत असल्याच्या पार्श्वभूमीवर झेलेन्स्की यांनी आज जनतेशी संवाद साधला. युद्धाचा आज ४६ वा दिवस होता. झेलेन्स्की म्हणाले की,‘‘रशियाचा हल्ला युक्रेनपुरता मर्यादित नाही. संपूर्ण युरोप हेच त्यांचे लक्ष्य आहे.

त्यामुळे युक्रेनमधील युद्ध रोखून लोकशाहीचे संरक्षण करणे, ही संपूर्ण युरोपची जबाबदारी आहे. ज्यावेळी अराजकतेचे आक्रमण सुरु होते, त्यावेळी ती सर्व प्रकारची शांततता भंग करते. त्यामुळे ही अराजकता तातडीने रोखणे आवश्‍यक ठरते.’’ रशियाच्या तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रावर पूर्णपणे निर्बंध आणि युक्रेनला शस्त्रपुरवठा ही आपली मागणी आज त्यांनी पुन्हा एकदा केली. रशियाने युक्रेनमध्ये अतोनात नुकसान केले असले तरी भविष्याचा विचार करून आम्ही शांतता चर्चेची मागणी करतआहोत, असे झेलेन्स्की म्हणाले. युद्ध सुरु झाल्यापासून काही दिवसांतच मारीउपोल या बंदराच्या शहराला वेढा घातलेल्या रशियाच्या सैन्याने आज मोठे यश मिळविल्याचा दावा केला जात आहे. या शहराच्या ७० टक्के भागावर रशियन सैनिकांनी नियंत्रण मिळविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

युद्धाच्या आघाडीवर

  • ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांचा अचानक युक्रेन दौरा; युक्रेनला १२० चिलखती वाहने आणि जहाजविरोधी क्षेपणास्त्र यंत्रणा देण्याचे आश्‍वासन

  • युक्रेनमधून स्थलांतर केलेल्यांची संख्या ४५ लाखांवर

  • युक्रेनच्या अध्यक्षांचा शांततेसाठी आग्रह

  • युक्रेनमधील ऑस्ट्रीयाच्या दूतावासातील कर्मचारी किव्हमध्ये परतणार

  • युक्रेनला मदत करण्यासाठी जागतिक नाणेनिधीचा पुढाकार

  • युक्रेनच्या मदतीसाठी युरोपीय महासंघाकडून १० अब्ज डॉलरचा निधी गोळा

  • रशियाच्या सरकारी वाहिन्यांवर युट्यूबकडून बंद

दोन्बासच्या दिशेने रशियाची कूच

युक्रेनमधील इतर भागांमधील लक्ष कमी करून रशियाने पूर्व भागातील दोन्बास, लुहान्स्क आणि दोन्तेस्क या भागांवर लक्ष केंद्रीत केले असून तेथे सैन्याची मोठ्या प्रमाणावर जुळवाजुळव करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. दोन्बास बाहेर रशियाच्या लष्करी वाहनाची रांग लागली असून ती १३ किलोमीटर लांबीची असल्याचे उपग्रहांद्वारे दिसून आले आहे. युक्रेनमधील दोन्तेस्कसह अनेक ठिकाणी रशियाने आज विमानांद्वारे हल्ले केले. अनेक ठिकाणी क्षेपणास्त्रांचाही मारा केला.

प्रतिहल्ल्यांमध्ये रशियाचे नुकसान

खारकिव्ह, खेरसन या शहरांमध्ये युक्रेनचे प्रतिहल्ले होत असून रशियाचे मोठे नुकसान होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. युक्रेनच्या प्रतिहल्ल्यांमध्ये आतापर्यंत रशियाचे १९,३०० सैनिक, १५२ लढाऊ विमाने, ७२२ रणगाडे, १३७ हेलिकॉप्टर, ११९१ चिलखती वाहने, ३४२ तोफा आणि ७६ इंधन टाक्यांचे नुकसान झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT