Vladimir Putin nuclear submarines from Russia Moscow
Vladimir Putin nuclear submarines from Russia Moscow Vladimir Putin nuclear submarines from Russia Moscow
ग्लोबल

रशियाकडून आण्विक पाणबुड्या सज्ज; व्लादिमीर पुतीन

सकाळ वृत्तसेवा

मॉस्को : रशिया- युक्रेन युद्धाचा ३१ वा दिवस असून शस्त्रबंदी होण्याची कोणतीही शक्यता दिसत नसतानाच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी त्यांच्या आण्विक पाणबुड्या उत्तर अटलांटिक महासागरात रवाना केल्या आहेत. या महासागराजवळ युरोपीय समुदायातील अनेक देश आहेत.

युक्रेनचे समर्थन करणाऱ्या पाश्‍चिमात्य देशांना त्याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रशियाने आण्विक पाणबुड्या उत्तर अटलांटिक महासागरात पाठविल्या आहेत. युक्रेनवर हल्ला केल्याच्या काही कालावधीतच आण्विक प्रतिबंध आणि संरक्षण प्रणाली सज्ज ठेवण्याचा आदेश पुतीन यांनी दिला होता. आता १६ बॅलेस्टिक क्षेपणास्त्र वाहून नेण्‍यास सक्षम असलेल्या अनेक पाणबुड्या रशियाने उत्तर अटलांटिक महासागारात उतरविल्या आहेत. पुतीन यांच्या या अण्वस्त्रांच्या बेगमीवर पाश्‍चिमात्य देशांतील गुप्तचर संघटनांचे बारीक लक्ष आहे.

सैनिकी कारवाईचा पहिला टप्पा पूर्ण

युक्रेनमधील सैनिकी कारवाईचा पहिला टप्पा जवळजवळ पूर्ण झाला आहे. आता पूर्व युक्रेनमधील डोनबसचा प्रदेश पूर्णपणे मुक्त करण्यावर रशियाचे फौजांचे लक्ष असेल, असे रशियाने शुक्रवारी (ता.२५) स्पष्ट केले. लुशान्स्कचा ९३ टक्के आणि डोन्स्तकचा ५४ टक्के भागाचा ताबा रशियन-समर्थक फुटीरतावाद्यांनी घेतल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले. या दोन्ही भागांचा समावेश डोनबस भागात होतो. सैनिकी कारवाईच्या पहिल्या टप्प्यातील मुख्य उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. यामुळे डोनबसला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या मुख्य हेतूवर आम्हाला काम करणे शक्य होईल, असे रशियाच्या जनरल स्फाट मुख्य मोहीम संचालनालयाचे प्रमुख सर्जी रुड्स्कोय यांनी सांगितले.

रशियाकडे सर्वांत जास्त अण्वस्त्रे

रशियाकडे चार हजार ४४७ अण्वस्त्रांचा साठा आहे. जगात सर्वाधिक अण्वस्त्रसाठा रशियाकडे आहे. शत्रूच्या मोक्याच्या ठिकाणांना संपूर्णपणे उद्धवस्त करू शकणारी शेकडो अण्वस्त्रांचा त्यात समावेश आहे. अशा शस्त्रास्त्रांचा वापर करणे सहज नसले तरी रशियाचे शास्त्रज्ञ त्यात निपुण आहेत, असे संरक्षणविषयक तज्ज्ञांचे मत आहे. रशियाने आतापर्यंत युक्रेनवर डागलेल्या क्षेपणास्त्रांमध्ये अण्वस्त्रांचा समावेश असल्याचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचा दावा एका पाश्चिमात्य अधिकाऱ्याने केला आहे. ‘स्कोक्रॉफ्ट स्ट्रॅटेजी इनिशिएटिव्ह’चे महासंचालक डॉ. मॅथ्यू क्रोनिग यांच्या म्हणण्यानुसार पुतीन दोन कारणांसाठी त्यांच्या अण्वस्त्रधारी दलांना सज्ज ठेवतात. यातून रशियावर अण्वस्त्रांचा हल्ला होण्याची शक्यता कमी होते आणि रशियाकडून जोरदार प्रतिहल्ला होण्याची भीती शत्रू पक्षाला असते. दुसरे म्हणजे रशियाची अण्वस्त्रे मोक्याच्या ठिकाणी ठेवलेली असतात. यातून गरज भासल्यास सहजपणे हल्ला करता येतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT