ग्लोबल

दररोज आठ लाख डॉलर खर्च करणारा हा आहे तरी कोण?

पीटीआय

क्वालालंपूर - मलेशियातून हकालपट्टी झालेले माजी नेते नजीब रझाक यांचे इटलीमध्ये वास्तव्य असताना त्यांनी पंचतारांकित हॉटेलातील वास्तव्यावर कोट्यवधी डॉलर्सची उधळपट्टी केल्याचे समोर आले आहे. या हॉटेलातील रझाक यांचा एका दिवसाचा खर्च आठ लाख डॉलर एवढा होता, अशी माहिती न्यायालयीन सुनावणीतून पुढे आली आहे.

रझाक यांचे नाव याआधीही आलिशान जीवनशैलीमुळे चर्चेत होते. इटलीतील वास्तव्यामध्ये त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी तिजोरीतून मोठी उधळपट्टी केल्याचे समोर आले आहे. रझाक, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या वर्तुळातील अन्य काही व्यक्तींनी सरकारी तिजोरीतून कोट्यवधी डॉलर चोरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मागील वर्षी मलेशियामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये रझाक यांना सत्ता गमवावी लागली होती. सत्ताच्युत होताच त्यांना अटक करण्यात आली होती, तसेच एप्रिलमध्ये त्यांच्याविरोधात खटलाही भरण्यात आला होता.

रझाक यांनी आरोप फेटाळले
सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान बॅंक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतर न्यायाधीशही अवाक्‌ झाले. रझाक यांनी त्यांच्याकडील दोन्ही क्रेडिट कार्डचा वापर करून इटलीतील एका पंचतारांकित हॉटेलामध्ये प्रत्येक दिवशी आठ लाख डॉलरची उधळण केल्याचे स्पष्ट झाले आहे. रझाक यांनी मात्र अन्य देशांच्या सरकारांमध्ये काम करणाऱ्यांसाठी ही एक साधारण भेट होती, असे सांगत या वारेमाप खर्चाचे आरोप फेटाळून लावले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''सुनीतासारखी बायको मिळाल्याबद्दल देवाचे आभार मानतो, माझ्यासारख्या...'' अरविंद केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

Shikhar Dhawan Retirement: क्रिकेटला करणार गुडबाय? दुखापतीवर अपडेट देत शिखर धवन स्पष्टच बोलला...

Aishwarya Narkar: "हे तुम्हाला शोभतं का? असं म्हणू नका!"; ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकरचं सडेतोड उत्तर

Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवालसह इतरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनाचा अर्ज मोकळा

Latest Marathi News Live Update : पुणे कार अपघात प्रकरणी आरोपींचा जामिनासाठी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT