Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Latest Political News: दिवसभरातील देश-विदेश आणि राज्यातील घडामोडी तुम्हाला याठिकाणी वाचायला मिळतील.
Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateEsakal

सेप्टिक टँक साफ करताना दोघांचा गुदमरुन मृत्यू

दिल्लीतल्या जुना जसोला गावात एका घरात सेप्टिक टँक साफ करताना गुदमरून दोघांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

पंतप्रधानांच्या गॅरंटीने लोक प्रभावित- कंगना रणौत

मंडी लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार कंगना रणौत म्हणाल्या की, आमची रॅली यशस्वी झाली असून पंतप्रधानांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. त्यांनी दिलेल्या गॅरंटीने लोक खूप प्रभावित झाले आहेत.

अशोक सराफ व रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबईच्या वतीने दरवर्षी १४ जून रोजी गो. ब. देवल पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी जेष्ठ सिने-नाट्य अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. मागील तीन वर्षांपासून पुरस्कारांचे वितरण करण्यात आले नव्हते. नाट्य परिषदेची निवडणूक पार पडताच, कमी वेळात तातडीने नवनिर्वाचित नियामक मंडळाने जीवनगौरव पुरस्कार देण्याचे योजिले व पुरस्कार जाहीर केले.

प्रवरा नदी पात्रात आज पुन्हा दोन तरुणांचा बुडून मृत्यू; संगमनेर शहरातील नदी पात्रात घडली घटना

प्रवरा नदी पात्रात आज पुन्हा दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. संगमनेर शहरातील नदी पात्रात ही घटना घडली आहे. अकोले येथील घटनेत सहा जणांच्या मृत्यूची घटना ताजी असताना पुन्हा एकदा दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. संगमनेरच्या गंगामाई घाट परिसरात ही घटना घडली आहे. प्रवरा नदीपात्रात तरुण पोहायला गेले होते. आदित्य रामनाथ मोरे वय 17 वर्ष रा. घुलेवाडी आणि श्रीपाद सुरेश काळे वय 17 वर्ष रा. कोळवाडे, अशी मयातांची नावे आहेत. नदी पात्रातील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने तरुण बुडाल्याची माहिती आहे. अवैध वाळू उपशामुळे नदी पात्रात खड्डे पडल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

डोंबिवली दुर्घटनेतील मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी होणार डीएनए चाचणी

अमुदान कंपनीत ब्लास्ट मध्ये बेपत्ता असलेल्यांच्या नातेवाईकांची हॉस्पिटलमध्ये गर्दी झाली आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आता डीएनए टेस्ट करण्यात येणार आहे. आठ मधील दोन मृतदेहांची ओळख पटली आहे, सहा मृतदेहांची ओळख पटेना. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात नातेवाईकांची डीएनए टेस्टसाठी सॅम्पल घेण्याचे काम सुरू आहे. सापडलेले मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट केली जात आहे.

पुणे कार अपघात प्रकरणी आरोपींचा जामिनासाठी अर्ज दाखल

पुण्यातील कल्याणीनगर येथील कार अपघात प्रकरणातील सहाही आरोपींनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.

खंबाटकी घाटात शिवशाही बंद पडल्यानं वाहतूक कोंडी

खंबाटकी घाटात शिवशाही बंद पडल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळं सध्या पुणे-सातारा महामार्गावरील जुना टोल नाका इथं वाहतूक कोंडी झाली आहे. हा मार्ग सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलीस बस बंद पडलेल्या ठिकाणी दाखल झाले आहेत. दुपारीही दोन ते अडीच तास वाहतूक कासवगतीनं सुरु होती.

सीताबर्डी बाजारातील दुकानात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन

नागपूर शहरातील सीताबर्डी बाजारातील दुकानात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्यानं खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अज्ञान व्यक्तीकडून आलेल्या फोननंतर पोलिसांनी परिसरात शोध मोहिम सुरु केली आहे.

Swati Maliwal Assault Case : स्वाती मालीवाल हल्ला प्रकरणी केजरीवालांच्या सहकाऱ्याला न्यायालयात केले हजर

आप खासदार स्वाती मालीवाल हल्ला प्रकरण : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी बिभव कुमार यांना पोलीस कोठडी संपल्यानंतर तीस हजारी न्यायालयात आणण्यात आले. त्यांना 18 मे रोजी अटक करण्यात आली होती.

12th Supplementary Exam : बारावी पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये होणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया येत्या सोमवारपासून (ता. २७) सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांचे पुरवणी परीक्षेसाठीचे अर्ज ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर भरण्यात यावेत, असे आवाहन राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

Dombivli Blast Case : डोंबिवलीतील अमुदान कंपनीच्या फरार मालकाला अटक; नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

Dombivli Blast Case : डोंबिवलीतील अमुदान कंपनीच्या फरार मालकाला अटक करण्यात आली आहे. नाशिक पोलिसांनी ही मोठी कारवाई केली असल्याचे समजते. काल रात्रीपासून नाशिक क्राइम ब्रांच युनिट एक आणि ठाणे क्राइम ब्रांच पोलिसांनी संयुक्त पद्धतीने ही कारवाई केली. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काँग्रेस आणि आपची युती असूनही भाजप दिल्लीतील सर्व सात जागा जिंकेल - रामदास आठवले

मुंबई : "2014 आणि 2019 च्या निवडणुकीत भाजपने दिल्लीतील सर्व सात जागा जिंकल्या. काँग्रेस आणि आपची युती असूनही भाजप दिल्लीतील सर्व सात जागा जिंकेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. ते माध्यमांशी बोलत होते.

Legislative Council Elections : विधान परिषद निवडणुकांची नवी तारीख जाहीर, 26 जूनला होणार मतदान

मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीदरम्यान जाहीर करण्यात आलेल्या विधान परिषद निवडणुकांची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी २६ जूनला मतदान होणार आहे, तर १ जुलै रोजी मतमोजी केली जाणार आहे.

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या रॅलीपूर्वी जालंधरमध्ये अनेक ठिकाणी कडक सुरक्षा तैनात

पंजाब : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीपूर्वी जालंधरमध्ये अनेक ठिकाणी कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी आज जालंधरमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.

पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी ड्रायव्हरच्या जबाबामुळे उडाली खळबळ

पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. ड्रायव्हरने पुणे पोलिसांना जबाब दिला आहे. गाडी अल्पवयीन तरुणच चालवत होता. अपघात झाला, तेव्हा ड्रायव्हिंग व्हील अल्पवयीन तरुणाच्या हाती होतं, असं समोर आलंय. अपघात झाला तेव्हा ड्रायव्हर अल्पवयीन तरुणाच्या शेजारी बसला होता. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ड्रायव्हरची कसून चौकशी केली असून गंगाराम पुजारी असे ड्रायव्हरचे नाव आहे.

Thane Traffic Police : घोडबंदर घाट रस्ता दोन आठवडे राहणार बंद

घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटातील ७०० मीटर लांब रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण केले जाणार आहे. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना ६ जूनपर्यंत बंदी घातली आहे. मात्र, हलक्या वाहनांची वाहतूक मार्गावरून सुरू राहणार आहे.

Girna Dam Nashik : गिरणा धरणातून जळगाव जिल्ह्यासाठी सोडले पाणी

नाशिक : नाशिकच्या गिरणा धरणातून आज सकाळी सहा वाजता जळगाव जिल्ह्यातील भडगाव, पाचोरा, दहिगाव बंधारा, कानालदा यासाठी पिण्याचे चौथे आवर्तन सोडण्यात आले आले आहे. दोन हजार क्यूसेक वेगाने पाणी गिरणा नदी पत्रातून वाहत असल्याने नदी काठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

Harshvardhan Patil : इंदापूरच्या तहसीलदारांवरील हल्ल्याचा हर्षवर्धन पाटील यांच्याकडून निषेध

इंदापूर : इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. यामुळे शहरात गोंधळ उडाला असून या घटनेची माहिती घेत राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष, माजी मंत्री भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला केला.

Nashik News : नाशिकमध्ये सराफ व्यापाऱ्यांवर आयकर विभागाच्या धाडी

नाशिकमध्ये सराफ व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने धाड टाकली असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.

Maharashtra Draught : राज्यातील अनेक धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा- शरद पवार

राज्यातील पाणी टंचाईवर चिंता व्यक्त करत शरद पवार म्हणाले की,

  • राज्यातील अनेक धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे.

  • काही ठिकाणी पिण्याचे पाणीही मिळत नाही. संभाजीनगरमध्ये सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा.

  • उजनी धरणात शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा

Kedarnath: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरला हेलिपॅडपासून दूर उतरवावं लागलं, भाविकांचा वाचला जीव 

केदारनाथमध्ये एका खासगी कंपनीच्या हेलिकॉप्टरला तांत्रिक बिघाडामुळे हेलिपॅडपासून अवघ्या काही मीटर अंतरावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. या घटनेत कोणालाही जखम झाली नाही आणि हेलिकॉप्टरमधील सर्व लोक सुखरूप आहेत. हेलिकॉप्टरमध्ये 6 भाविकांसह एकूण 7 जण होते.

Pune Porsche Accident: पुणे कार अपघात प्रकरणात खासदार मेधा कुलकर्णी यांनी तपासाबाबात उपस्थित केला प्रश्न 

Pune Porsche Accident: पुणे कार अपघात केस संदर्भात मेधा कुलकर्णी यांनी  पुणे पोलीस आयुक्तांसोबत चर्चा केली. या दरम्यान त्यांनी ब्लॅक या पबच्या मालकाचे नाव FIR मधून का वगळण्यात आले असा प्रश्न उपस्थित केला. सर्वच्या सर्व गुन्हेगारांना, दोषींना त्वरित शासन व्हावे अशी आग्रही मागणी कुलकर्णी यांनी केली.

Pune Porsche Accident: आमच्याकडे पबमध्ये दारू पितानाचे सीसीटीव्ही फुटेज आहेत- पुणे पोलीस आयुक्त

पुणे कार अपघात प्रकरणावर, पुण्याचे सीपी अमितेश कुमार म्हणाले, "आमच्याकडे पबमध्ये दारू पितानाचे सीसीटीव्ही फुटेज आहेत. आमच्याकडे पुरावे आहेत. पोलिस स्टेशनमधील पिझ्झा पार्टी झाली त्यात काहीही तथ्य नाही"

Pune Porsche Accident: पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का याचा तपास सुरु आहे- पुणे पोलीस आयुक्त

पत्रकार परिषदेत पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?

  • दबाव किंवा दिरंगाई झाली असे म्हणणं योग्य नाही.

  • पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का याचा तपास सुरु आहे.

  • आरोपीला पोलिस ठाण्यात विशेष सुविधा दिल्या का याचा तपास सुरु

  • आरोपीचे ब्लड रिपोर्ट मिळाले नाहीत

Dombivali Boiler Blast: डोंबिवली बॉयलर स्फोट प्रकरणी केमिकल कंपनीवर गुन्हा दाखल

डोंबिवली बॉयलर स्फोट प्रकरणी अमुदान केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक- मालती प्रदीप मेहता, मलय प्रदीप मेहता यांच्यासह कंपनीचे संचालक, प्रशासक आणि इतर अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. कलम 304, 324, 326, 285, 286, 427 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला: ठाणे पोलिस

Pune Accident Case:  पुणे अपघात प्रकणावर पुणे पोलिसांची थोडाच वेळात पत्रकार परिषद

Pune Accident Case: पुणे अपघात प्रकणात विशाल अग्रवालला आज कोर्टात हजर करणार

Pune Accident Case: पुणे अपघात प्रकणात विशाल अग्रवाल यांना आज पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

Dombivali boiler blast: डोंबिवली दुर्घटनेतील जखमींची मुख्यमंत्र्यांनी एम्समध्ये जाऊन केली विचारपूस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली दुर्घटनेतील जखमींची एम्समध्ये जाऊन विचारपूस केली आहे.

Pune News: पुणे अपघात प्रकरणी आज ठिक-ठिकाणी आंदोलन

पुणे अपघात प्रकरणावरुन नागरिक आक्रमक झाले आहे. पुण्यात आज ठिकठिकाणी आंदोलन केले जाणार आहे.

Nagpur News: कृषी उत्पन्न समिती 4 दिवस बंद ठेवण्यास व्यापाऱ्यांचा विरोध

कळमना कृषी उत्पन्न समिती चार दिवस बंद ठेवण्यास व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे.

Dombivli Blast: अंबादास दानवे डोंबिवली स्फोट दुर्घटनास्थळी

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी डोंबिवली स्फोट दुर्घटनास्थळाला भेट दिली आहे. त्यांनी स्थितीचा आढावा घेतला.

Ahmadnagar News: बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

अहमदनगरच्या राहुरी तालुक्यामध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.

Dombivli MIDC Blast Accident: डोंबिवली अपघात प्रकरणात आणखी एकाचा मृत्यू

डोंबिवली स्फोटामध्ये आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या आता ९ झाली आहे.

Amit Thackeray: अमित ठाकरे यांचा आज वाढदिवस

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. ते आज ३२ वर्षांचे झाले आहेत.

डोंबिवली येथील एमआयडीसीमधील पीडित कुटुंबियांना ५ लाखांची आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केली आहे. पुणे अपघात प्रकरणी दररोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. आज मनसेचे युवानेते अमित ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. सहाव्या टप्प्यातील मतदान उद्या होईल. त्यामुळे आज प्रचार थंडावला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com