Year round Effects on thyroid of Corona vk11
Year round Effects on thyroid of Corona vk11  
ग्लोबल

कोरोनाचा थॉयरॉईडवर वर्षभर परिणाम

सकाळ वृत्तसेवा

लंडन - गेली दोन-तीन वर्षे जग कोरोना विषाणुशी लढा देत आहे. कोरोनाचा मानवी शरीरातील विविध अवयव व ग्रंथींवर होणारा परिणाम समोर येत आहे. कोरोनामुळे थायरॉईड ग्रंथीवर वर्षभरापेक्षा अधिक काळ परिणाम होत असल्याचे नुकतेच एका संशोधनात आढळले आहे. इटलीतील मिलान विद्यापीठातील संशोधकांनी हे संशोधन केले आहे. कोरोना विविध यंत्रणांद्वारे थायरॉईडच्या कार्यावर परिणाम करत असल्याचे आढळले. अंतस्त्रावग्रंथीवरील २४ व्या युरोपीय परिषदेत अहवालाचे निष्कर्ष सादर करण्यात आले.

संशोधकांनी कोरोना संसर्ग झालेल्या व थायरॉईडचे कार्य विस्कळित झालेल्या १०० पेक्षा अधिक रुग्णांवर संशोधन केले. यावेळी, कोरोनाचा मध्यम ते तीव्र संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये थायरॉडिटिस - थायरॉईड ग्रंथीचा दाह महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे लक्षात आले. यापैकी निम्म्या रुग्णांमध्ये वर्षभरानंतरही थायरॉडिटिसचा आकार कमी झाला तरी तो सक्रिय असल्याचे आढळले. हायपोथलॅमस-पिट्युटरी आणि थायरॉईड ग्रंथीव्यतिरिक्तच्या ज्ञात कार्याशिवाय थायरॉडिटिसची भूमिका लक्षात आली. कोरोनामुळे निर्माण होणारे संप्रेरकात सौम्य असंतुलन निर्माण होत असले तरी त्यामुळे कोरोनाचे गंभीर रुग्ण वाढत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

थायरॉईड ग्रंथीचे कार्य

मानवी शरीरातील चयापचय, वाढ आणि विकासात थायरॉईड ग्रंथीची भूमिका महत्त्वाची असते. रक्तामध्ये सातत्याने थायरॉईडचे ठराविक प्रमाण मिसळत राहिल्याने शरीरातील अनेक कार्ये सुरळीतपणे पार पडण्यात मदत होते. शरीराची वाढ होत असताना किंवा महिलांमध्ये गर्भारपणात अधिक ऊर्जेची गरज असल्याने थायरॉईड ग्रंथी अधिक प्रमाणात स्त्राव सोडतात.

थायरॉईडचे असंतुलन आणि कोरोना संसर्गामध्ये स्पष्ट संबंध आहे. थायरॉईड ग्रंथीतील विस्कळित होणाऱ्या कार्याचा आणि कोरोनाच्या गंभीर संसर्गाचा परस्परसंबंध आहे. तो समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे, कोरोना संसर्गामध्ये थायरॉईड ग्रंथी थेटपणे गुंतलेली दिसून येते. हा वस्तुस्थितीही लक्षात घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

- इलारिया मुल्लेर, संशोधक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: कॉंग्रेसमध्ये आता अशी वेळ आली आहे की, ते कोणाचेच ऐकत नाहीत - राजकुमार चौहान

SCROLL FOR NEXT