ग्लोबल

चक्क एका शहाळ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात; मग काय, बोलवायला लागलं चक्क एका मांत्रिकाला

योगेश कानगुडे

मुंबई : भारत हा विविधतेने नटलेला देश. आपल्या देशात काही किलोमीटरनंतर एक वेगळी भाषा बोलली जाते, ऐकली जाते. जसजसे प्रदेश बदलतात तसतशी संकृती देखील बदलते. मात्र या विविधतेला कर्मकांड आणि अंध्दश्रद्धेची देखील किनार आहे. भारतात जसा अंधश्रद्धेचा बाजार मांडला जातो तसा इतर देशात पाहायला मिळत नाही, असं कुणी म्हणत असेल तर ते चुकीचं ठरेल. कारण भारताप्रमाणे इतरही देशांमध्ये अंधश्रद्धेचा बाजार मांडला जातो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही बातमी. 

बातमी आहे मालदीव बेटांवरील. २०१३ मध्ये मालदीवमध्ये राष्ट्रपती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चक्क एका शहाळ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या शहाळ्याचा गुन्हा म्हणजे त्यावर लावले गेलेले काळ्या जादूचे आरोप. मालदीवमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक शहाळं हे एका शाळेच्या बाहेर ठेवलेलं आढळून आलं होतं. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांदरम्यान ती शाळा मतदान केंद्र म्हणून मालदीव सरकारकडून वापरात होती. 

या बेटावरील नागरिकांना अशी भीती होती की, कदाचित ते शहाळं मंतरलेलं, काळ्या जादूशी संबंधित आहे. त्या शहाळ्याच्या माध्यमातून निवडणुकीत छेडछाड करण्यासाठी जादूटोणा केला गेलाय. महत्त्वाची बाब म्हणजे या शहाळ्यावर 'सुरा' म्हणजेच काही विशिष्ठ मंत्र हे अरेबिक भाषेत लिहिले गेलेले. ज्यामुळे मालदीव बेटावरील नागरिकांमध्ये घबराहट पसरली होती.   

सगळा प्रकार समोर आल्यांनतर तिथल्या अधिकाऱ्यांनी एका "रुकिया" म्हणजेच जादूगाराला बोलावलं. ज्याने हा सगळा प्रकार खोटा असल्याचं उघड केलं आणि संपूर्ण प्रकारातून कुणाला कोणताही धोका नसल्याचं जाहीर केलं.  

तुम्हाला, अशी कोणती घटना माहिती आहे का जिथे काळ्या जादूने वादळ निर्माण केलं आणि नंतर हा सर्व प्रकार भंपक आहे हे पुढे आलं ?  माहित असले तर आम्हाला कमेंटमध्ये प्रतिक्रिया नोंदवून नक्की कळवा. 

young and fresh coconut was taken into custody in the Maldives after police received complaints

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'अरे ९० वर आहे, आऊट होईल...'! खेळाडूने स्लेजिंग केली, Vaibhav Suryavanshi चा 'Cute' रिप्लाय; मोडला गिल, AB चा विक्रम...

Pune News : दौंडमध्ये SRPF च्या ७१ व्या दीक्षांत संचलनात ३१६ नवप्रविष्ठांना कर्तव्यशपथ; आधुनिक युद्धतंत्राची तयारी सुरू!

Latest Marathi News Live Update : शनैश्वर देवस्थानचा कारभार विश्वस्तांनीच पहावा, उच्च न्यायालयाचा आदेश

Google Search : रात्रीच्या वेळी मुली गुगलवर सर्वांत जास्त काय सर्च करतात? 2025 च्या धक्कादायक डेटामुळे जग हादरलं

Manchar News : मंचरमध्ये हुतात्मा बाबू गेनू प्राण ज्योतीचे जल्लोषात स्वागत; घोषणांनी दुमदुमला छत्रपती शिवाजी महाराज चौक!

SCROLL FOR NEXT