Shri Shri Ravishankar
Shri Shri Ravishankar 
health-fitness-wellness

चेतना तरंग : भविष्याची भीती

श्री श्री रविशंकर

एक गावात दोन खेडूत एके ठिकाणी गप्पा मारत बसले होते. दोघेही एकमेकांचे जिवलग मित्र होते. एकाने दुसऱ्याला विचारले, ‘‘तू कसला विचार करत आहेस?’’ दुसरा म्हणाला, ‘‘मी पाच एकरांची एक बाग खरेदी करायचा विचार करतोय.’’ त्यावर पहिला गावकरी म्हणाला, ‘‘कशासाठी?’’ ‘‘मी एक रेडा विकत घ्यायचा विचार करतो आहे. माझा रेडा तुझ्या बागेत शिरून नुकसान करेल. त्यामुळे आपल्या दोघांमध्ये उगाचच वितुष्ट येईल. मला आपली मैत्री टिकवायची आहे.’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हे ऐकल्यावर पहिला म्हणाला, ‘‘तुला इतके वाटत असेल, तर तू रेडा विकत घेऊ नकोस. मी मात्र बाग घेण्याचे नक्की ठरविले आहे.’’ त्यावर दुसरा गावकरी म्हणाला, ‘‘नाही, नाही. रेडा विकत घेण्यासाठी मी आगाऊ रक्कमसुद्धा दिली आहे.’’ पहिला म्हणाला, ‘‘मी बागेला व्यवस्थित कुंपण घालेन; मग तुझा रेडा बागेत कसा घुसेल?’’ दुसरा म्हणाला, ‘‘शेवटी तो रेडाच, तो कुठूनतरी वाट काढून तुझ्या बागेत शिरेल.’’ दोघांमधली वादावादी वाढली व त्याचे रूपांतर मारामारीत झाले. त्यांचे भांडण शेवटी ग्रामपंचायतीसमोर मांडले. दोघांपैकी कोणी रेडा विकत घेतलेला नव्हता किंवा बागही खरेदी केलेली नव्हती. त्या दोघांची नुसती मनाची शर्यत सुरू होती! 

आपली भीती अशीच असते. अजून भविष्यकाळ समोर आलेला नसतो. परंतु, आपण आधीच ‘आता काय होईल?’ असा विचार करून गर्भगळीत होतो. शेवटी काय होणार? तुम्ही मरणार! भविष्याबद्दल इतकी कसली भीती? असले विचार करून मन गोंधळून जाते, अस्वस्थ होते आणि वर्तमानात काय चालले आहे, याचा त्याला विसर पडतो. अशा परिस्थितीत मन पूर्णपणे ईश्वराला विसरते. ‘‘मी, माझे, उद्या काय होईल, परवा काय होईल, पुढच्या वर्षी काय होईल, दहा वर्षांनी काय होईल...’’  लोक असा विचार करत करत अगदी पुढच्या जन्मापर्यंत जातात! नवीन लग्न झाल्यावर नवरा-नवरी जन्मोजन्मी एकत्र राहण्याची  शपथ घेतात. वास्तवात, एका जन्मातच एकमेकांना कंटाळतात. परंतु, बोलताना पुढच्या सातजन्मांचा संकल्प सोडतात! अर्थात, काही काळानंतर त्यांना वस्तुस्थिती लक्षात येते.

आपण ईश्वरी अस्तित्वाची अनुभूती घेतली पाहिजे. आपल्याभोवती असलेला ईश्वरी प्रकाश अनुभवला पाहिजे; तशी तुम्हाला उत्कट इच्छा व्हायला पाहिजे. ईश्वरी प्रकाशाची अनुभूती आपल्याला मिळावी, अशी आत्तापर्यंत आपण कधी इच्छा व्यक्त केली होती का? गाढ शांती लाभावी, अशी इच्छा तुम्ही कधी केली होती का? तो ईश्वरी प्रकाश किंवा ईश्वरी शक्तीमुळे आज जग चालू आहे. कोणतीही गोष्ट करताना त्यात स्वतःला झोकून दिले पाहिजे, तरच त्या शक्तीचे अस्तित्व तुम्हाला जाणवेल. तुम्ही जेव्हा गाता किंवा प्रार्थना करता तेव्हा त्यात पूर्णपणे समरस व्हायला पाहिजे. खरे तर दु:ख झाल्यावर त्यात तुम्ही जास्त गुंतता आणि समरस होता.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT