kids
kids kids
health-fitness-wellness

Coronavirus| होम आयसोलेशनमध्ये चिमुकल्यांची 'अशी' घ्या काळजी

मनोज साखरे

औरंगाबाद: बालकांना कोविड (covid 19 in kids) होऊ नये याची काळजी घ्यायचीच आहे, परंतू बालकांना अलगीकरणात ठेवण्याची वेळ आलीच तर काळजी घ्यायला हवी. सोबतच सकस आहाराकडे लक्ष द्यायला हवे. या काळात तीन दिवसांपेक्षा जास्त ताप, सुस्तपणा, श्वासाची गती वाढणे, ऑक्सीजन पातळी ९४ टक्क्यांपेक्षा कमी, लघवीचे प्रमाण कमी, पुरळ, डोळे-ओठ लाल होणे, फिट येणे असे अशी लक्षणे धोक्याची आहेत. हे लक्षात घेता डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

बालकांना कोविडची लक्षणे आढळल्यास अथवा चाचणी केल्यानंतर स्वतंत्र हवेशीर खोलीत ठेवायला हवे. घरातील इतरांना मास्क वापरायला हवा. बालकांची ऑक्सिजन पातळी समजण्यासाठी पल्स ऑक्सीमीटरचा दर्जा चांगला असावा. बाळ रडताना, हात हलत असल्यास अथवा ओले असल्यास, हाताला मेहंदी, नखपॉलिश असल्यास, चुकीची रीडींग येऊ शकते. बाळ शांत झाल्यावर, ३ वेळा रीडींग घ्या. ९५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास डॉक्टरांना भेटावे.

दूध पिणाऱ्या बाळाबाबत-

दूध पिणाऱ्या बाळाला लक्षणे असतील व ते अलगीकरणात आईसोबत असेल तर, काळजी घेऊन (फिडींग) सुरू ठेवा. आईनेही पौष्टिक आहार घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे उपचार घ्यावे. घरी देखरेख तक्ता ठेवावा, त्यामध्ये बालकांची ताप, हृदयाचे ठोके, श्वासाची गती, ऑक्सिजन, लघवीचे प्रमाण, पिण्याच्या पाण्याचे प्रमाण या बाबीची नोंद दर सहा तासांनी ठेवावी व डॉक्टरांच्या संपर्कात राहावे. होम आयसोलेशनमध्ये स्वतःच्या मनाने ‘नेब्युलायझर’ने वाफ बाळाला देऊ नका. त्यामूळे विषाणूचा प्रसार होण्याची व घरातील इतर व्यक्तींना कोरोना विषाणू पसरू शकतात. बालरोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने नेब्युलायझरऐवजी एमडीआय (इन्हेलर) वापरावे.

बालकांना मास्क वापरताना-

-दोन वर्षाच्या आतील बालकांना, अती आजारी किंवा मतिमंद बालकांना मास्क लावू नका.

-त्यामुळे श्‍वास गुदमरण्याचा धोका असतो.

-मास्क लावताना नाक व तोंड पूर्णपणे झाकेल हे पहा. ओला वापरू नये.

-मास्कच्या पुढील बाजूला हाताने स्पर्श करू नका. मास्क खिशात ठेऊ नका.

-तीन पदरी कापडी मास्क वापरानंतर साबणाच्या पाण्यामध्ये धुऊन टाका.

-एन-९५ मास्क असतील तर किमान ५ मास्क असावे, त्यावर नंबर लिहा. दर ५ दिवसांनी एक एन-९५ मास्क परत वापरावा.

-एन-९५ मास्क ऐवजी उपरने, ओढणी, रुमाल करोना वायरस पूर्णपणे रोखु शकत नाही.

-एकच मास्क वारंवार खुप दिवस वापरल्यामुळे कोरोना, म्युकर मायकोसीसचा धोका होऊ शकतो.

‘‘बालकांचा ताप मोजण्यासाठी थर्मलगन वापरू नये. डिजीटल तापमापीचा वापर करावा. तापमापी काखेत १ मिनीट, आवाज येईपर्यंत ठेवावी. तापमान ९९.५ F/ ३८oC पेक्षा जास्त असले तर ताप असतो. लहान मुलांचे डोके सहसा गरम असते, त्यास ताप समजू नये.’’

- डॉ. रवी सावरे, बालरोगतज्ज्ञ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT