health-fitness-wellness

शोध स्वतःचा : Less is more

मागच्या वर्षी १४ जानेवारीच्या लेखात मी उल्लेख केला होता, ‘आनंदी राहण्यासाठी less is more हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. याबद्दल आपण पुन्हा केव्हातरी सविस्तर बोलू.’

देवयानी एम.

मागच्या वर्षी १४ जानेवारीच्या लेखात मी उल्लेख केला होता, ‘आनंदी राहण्यासाठी less is more हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. याबद्दल आपण पुन्हा केव्हातरी सविस्तर बोलू.’ ते बोलण्याचा योग आज दीड वर्षानं आला. आपली घरं पन्नास वर्षांपूर्वीपेक्षा आज मोठी आहेत, गाड्या मोठ्या आहेत. पण त्या प्रमाणात रिकामी जागा आहे का? नाही! वन ‘बीएचके’मधून ‘टू बीएचके’मध्ये गेलो, तर जरा मोकळेढाकळे जगता येईल असं वाटतं. पण मोठ्या घरात गेलो, की का कोणास ठाऊक शॉपिंग वाढतं आणि जागा पुरेनाशी होते. आणि मग पुन्हा अडगळ. आपल्या सर्वांनाच हॉटेलमध्ये किंवा रिसॉर्टमध्ये राहायला आवडतं. कारण तिथे सगळं सुटसुटीत, टापटिपीत तरीही आवश्यक ते असतं. कॉलेजमध्ये खिशात पैसे कमी होते, पण जास्त आनंदी होतो. आजही ते दिवस आठवून पुन्हा शाळा-कॉलेजचे दिवस मिळावेत, असं वाटतं. कॅम्पिंग-ट्रेकिंग केलं आहे का? आवडतं ना? हे सगळं आपल्याला आवडतं कारण त्यात मोकळेपणा होता, गर्दी कमी होती आणि आजूबाजूच्या गोष्टींची आसक्ती नव्हती. पण तरीही आवश्यक ते सर्व होतं. घरात सगळं मिळतं, पण सिंहगडावर जाऊन झुणका भाकरी आणि मटक्यातलं दही खाण्यातला आनंद काही वेगळाच आहे ना? पण घरात आईनं भाकरी टाकते म्हटलं, की स्विगी आठवतं.

सवय शॉर्टकटची...

मुळात आनंद बाहेरच्या गोष्टींत क्षणिकच असतो. एखाद्या नवीन कपड्यावर, गाडीवर, दागिन्यावर मन असल्यास ते घेईपर्यंत उतावीळ झालेलं मन ते विकत घेतल्यावर शांत होतं आणि काही काळ प्रचंड आनंदी असतं आणि मग नव्याचे नऊ दिवस संपले की कौतुकही संपतं. मग पुन्हा कुठल्यातरी दुसऱ्या गोष्टीवर मन परत बसतं आणि रिपीट... आज सगळं ऑनलाईन काही न करता मिळत आहे, त्याचे परिणाम फार भीषण आहेत. फास्ट फूड इंडस्ट्री आपल्या सगळ्यांना कसं गंडवते, हे जितकं लवकर आपल्या लक्षात येईल तितकं समाज म्हणून आपला ऱ्हास कमी होईल. सगळं आयतं मिळतं म्हणून कष्टाची तयारी कमी होते आहे. भूक लागली आहे, घरात स्वयंपाक बनला आहे किंवा बनला नसल्यास थोडं हात-पाय आणि डोकं चालवून बनवता येऊ शकतं, तरीपण चटपटीत खायच्या हौसेपायी बाहेरून मागवण्यानं शॉर्टकटची व फाजील लाडांची सवय लागत जाते. आणि मग सगळ्याच बाबतीत अशी अजून.. अजून.. अजूनची भूक वाढत जाते जी कधीच शमली जात नाही. आता यासाठी करायचं काय?

मन भरकटू देऊ नका

माझ्या आईनं मला लहानपणापासून कायम एक वाक्य सांगितले आहे. ‘मनाची शक्ती वाढवायची असल्यास त्याला जे हवं ते देऊ नकोस.’’ पालक मुलांच्या अवास्तव हट्टांना खोडून काढतात, तसं आपणही मधून मधून आपल्या चंचल मनाचे अवास्तव लाड नाही पुरवायचे. काय होईल? काहीही फरक पडणार नाही! कोणतीही गोष्ट खरेदी करताना एक मिनिट थांबा आणि स्वतःला विचारा ‘मला खरंच त्याची गरज आहे का, याने मला खरच आनंद होणार आहे का, की आता पुरतं भागणार आहे. दुसरा पर्यायच नाही का?’ बंगल्यामध्ये साध्या घरांपेक्षा जास्त दुःखी माणसं सापडतील, शहरांपेक्षा गावांमध्ये जास्त आनंदी व समाधानी चेहरे सापडतील. हे का! तर त्याचे उत्तर आहे ''less is more''. कोणतीही गोष्ट मोठ्या प्रमाणात असल्यानं आनंद तितक्या प्रमाणात वाढत नाही. मनाची आनंद शोधण्याची जागा चुकते आहे. ‘काखेत कळसा नि गावाला वळसा’सारखं आनंद हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये व मुळात आपल्या आत आहे. आनंद कशात मानायचा ही मनाची ठेवण असते. आत आनंदी-समाधानी राहण्याची वृत्ती असल्यास जिकडेतिकडे मन भरकटू देण्याची गरजच काय!

आज तुम्हाला मी होमवर्क म्हणून दोन गोष्टी सांगणार आहे.

1) तुमच्या घरातील तुमच्या कोणत्याही पाच गोष्टी, ज्यांची तुम्हाला खरंच गरज नाही व त्या नुसत्याच बराच काळ पडून आहेत त्या बाहेर काढा आणि ते दान करा. दान करण्याच्या अवस्थेत नसल्यास रिसायकल करा किंवा तेही शक्‍य नसेल तर टाकून द्या आणि हा उपक्रम दर महिन्याला एकदा करा.

2) तुम्हाला जेव्हा काही विकत घ्यावसं वाटेल, खायला ऑर्डर कराविशी वाटेल तेव्हा एक मिनिट पॉज घ्या आणि त्याच्या अगदी उलट करा. म्हणजे विकत घ्यायला जायचं नाही, वेबसाईट बंद करून टाकायची आणि खाण्याची ऑर्डर करण्याचा बेत कॅन्सल करून घरात जे काय आहे ते खायचं.

Less is more म्हणजे आपल्या गरजा कमी ठेवणे. वस्तूंमधल्या माणसांमधल्या गुंतवणुकीमध्ये minimalism आणला तर गर्दी, गोंधळ, चिंता, स्ट्रेस कमी होऊन विचारांची, आयुष्याची व नात्यांची क्वालिटी वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

Oneplus Nord CE 5 : वनप्लस Nord CE 5 लवकरच होणार लॉन्च; 7100mAh दमदार बॅटरी, आकर्षक फीचर्स अन् किंमत फक्त..

SCROLL FOR NEXT