Bald Bald
health-fitness-wellness

टक्कल पडले? चिंता नको, करा या उपायांचा वापर

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : स्त्री असो किंवा पुरुष प्रत्येकाला केस प्रिय असतात. कारण, केसांनी प्रत्येकाचे सौंदर्य वाढत असते. घनदाट, लांबसडक आणि चमकदार केसांमुळे सौंदर्यामध्ये भर पडते. सुंदर केसांमुळे सौंदर्य अगदी खुलून दिसते. मात्र, स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांचे केस लवकरच गळू लागतात. यामुळे टक्कल पडते. टक्कल पडणे ही कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायक घटना असते.

टक्कल पडलेला मनुष्य चांगला दिसत नाही. पुन्हा केस यावे यासाठी तो विविध प्रयोग करीत असतो. यामुळे आणखीच केस गळू लागतात. केसांना वेगवेगळे केमिकलयुक्त प्रोडक्टचा उपयोग केल्याने नुकसान सहन कारव लागते. तेव्हा सुरुवातीपासून केसांची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. घरगुती उपाय करून पुन्हा केस उगवू शकतो. तेही कोणत्याही हेअर ट्रांसप्लांटेशन शिवाय. तेलाचा योग्य वापर आणि नीट काळजी घेतली तर टक्कल पडलेल्या डोक्यावर केस येऊ शकतात आणि केसांचे गळणे पूर्णपणे रोखले जाऊ शकते.

तुम्हाला टक्कल पडत आहे याचा पहिला संकेत असतो केस खूप जास्त गळणे आणि नवीन केस उगवण्याची ग्रोथ कमी असणे वा अजिबातच केस न उगवणे. याशिवाय डोक्यावर वेगवेगळ्या ठिकाणी केस विरळ होऊ लागतात. ही लक्षणे दिसल्यास तुम्ही लागलीच आपल्या केसांची काळजी घ्यायला सुरुवात करावी. टक्कल दूर करण्यासाठी तुम्ही विविध घरगुती उपाय करू शकता.

जैतूनचे तेल

जैतूनचे तेल म्हणजेच ओलिव्ह ऑईल कोमट होईपर्यंत गरम करा. यानंतर तेलात एक चमचा मध व एक चमचा कडुनिंबाचे तेल टाकून मिक्स करा. हे मिश्रण डोक्यावर लावून २० ते २५ मिनिटांनी केस धुऊन घ्या. आठवड्यातून दोनवेळा हा उपाय केल्याने चांगले परिणाम दिसू लागतील.

कॅस्टर ऑईल

कॅस्टर ऑईल म्हणजेच एरंडेल तेल केसांसाठी वरदान आहे. टक्कल वाढू लागेल तेव्हा एरंडेलचे तेल योग्य प्रमाणात घेऊन त्यात सम प्रमाणात नारळ आणि आवळा तेल मिक्स करून हे तेल केसांना आणि डोक्याला लावा. दर दिवशी रात्री झोपण्याआधी डोक्यावर हे तेल लावून सकाळी उठून शॅम्पू करा. रोज हा उपाय करणे शक्य नसेल तर आठवड्यातून २ ते ३ वेळा करा. तुम्हाला महिनाभरात फरक दिसून येईल.

लिंबू

केस झडत असतील त्याजागी एका दिवसातून दोन ते तीन वेळा लिंबू लावा. असे केल्याने केसांची ग्रोथ पुन्हा सुरू होते. डोक्यावर पूर्ण टक्कल पडले तरी तुम्ही हा उपाय वापरू शकता. प्रत्येक वेळी लिंबू लावल्यानंतर केस धुवायलाच हवे असे काही नाही. तुम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा केस धुऊ शकता. प्रत्येक दिवशी अंघोळीच्या आधी केसांना लिंबूचा रस लावल्याने खूप जास्त फायदा होऊ शकतो.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची बनावट वेबसाइट अन् लिंक व्हायरल; वेळीच सावध व्हा, नाहीतर बसेल मोठा फटका

Sunday Evening Snack: संध्याकाळच्या भूकेची करा अशी सोय, चहासोबत तयार करा लेफ्टओव्हर पोळीच्या बाकरवडी

Madhuri Elephant Return : महादेवी हत्तीण महाराष्ट्रात परत येणार? खासदारांनी कोल्हापूरकरांना दिली मोठी खुशखबर

Crime: 'फ्रेंडशिप डे'लाच मैत्रीच्या नात्याला काळिमा! मान दाबली, मांडीवर सिगारेटचे चटके अन्...; तरुणाचं मुलीसोबत संतापजनक कृत्य

धक्कादायक! 'ऊस देऊन आठ महिने उलटले तरी दमडी नाही'; जिल्हाधिकाऱ्यांच्या तंबीनंतरही आडमुठेपणा, मुलांची शिक्षणे थांबली

SCROLL FOR NEXT