
उ. सोलापूर : जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतरही साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या उसाची रक्कम दिली नाही. गत पंधरवड्यात थकीत रकमेपैकी अवघे बारा कोटी रुपये शेतकऱ्यांचे देण्यात आले आहेत. कारखान्याला ऊस देऊन आठ महिने उलटले तरी ज्या शेतकऱ्यांना दमडीही मिळाली नाही अशा शेतकऱ्यांची पत धोक्यात आली आहे. काही शेतकऱ्यांच्या मुलांची शिक्षणे थांबली आहेत तर काहींच्या मुलांची लग्न थांबली आहेत.