Ulhasnagar crimeESakal
मुंबई
Crime: 'फ्रेंडशिप डे'लाच मैत्रीच्या नात्याला काळिमा! मान दाबली, मांडीवर सिगारेटचे चटके अन्...; तरुणाचं मुलीसोबत संतापजनक कृत्य
Friendship Day: आज संपूर्ण राज्यभरात फ्रेंडशिप डे म्हणजेच मैत्रीचा दिवस साजरा करत आहेत. अशातच उल्हासनगर येथे मैत्रीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे.
उल्हासनगर : आज संपूर्ण राज्यभरात फ्रेंडशिप डे म्हणजेच मैत्रीचा दिवस साजरा करत आहेत. अशातच ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे मैत्रीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. तरुणाने त्याच्या मैत्रिणीला शिवीगाळ करत सिगारेटचे चटके देऊन मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.