health-fitness-wellness

पाण्याची कमतरता मृत्यूस आमंत्रण देऊ शकते? काय आहेत गंभीर परिणाम?

विनायक होगाडे

आपल्या शरिरातील 60 टक्के भाग हा पाणी आहे. पण जर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली तर याचे काय गंभीर परिणाम होऊ शकतात, हे तुम्हाला माहितीय का पाण्याशिवाय आपण आयुष्याची कल्पनाच करु शकत नाही. एखाद्या व्यक्तीला जर काहीही खायला न देता फक्त पाणीच प्यायला दिलं गेलं तर तो आठ आठवड्यांसाठी जगू शकतो मात्र, एखादा व्यक्ती पाण्याशिवाय जेमतेम चारच दिवसांसाठी जगू शकतो. या उदाहरणावरुन तुम्हाला पाण्याचं महत्त्व नक्कीच लक्षात आलं असेल.

एखाद्या तरुण व्यक्तीच्या शरिर 60 टक्के भाग हा पाणी असतो. आणि त्याला जगण्यासाठी पाणी हा घटक वेळच्या वेळी मिळणं अत्यावश्यक असतं. आपल्या शरीराचं तापमान संतुलित राखण्याचं काम पाणी करतं. आपल्या डोळ्यांतील, नाकातील आणि तोंडातील पेशींमध्ये ओलावा राखण्याचं काम देखील पाण्यामुळे होतं. किडनी, स्वादुपिंड अशा शरीरातील अवयवांचं आणि पेशींचं संरक्षण करण्याचं तसेच त्यांना पोषक घटक आणि ऑक्सिजन पुरवण्याचं काम याच पाण्यामार्फत पार पाडलं जातं. याशिवाय इतरही अनेक महत्त्वाची कामं आपल्या शरीरातील पाणी पार पाडतं ज्यामुळे आपण आरोग्यदायी राहू शकतो.

तुम्हाला हे माहितीच झालं आहे की आपल्या शरीरातील 60 टक्के भाग हा पाणी आहे. मात्र, तुम्हाला हे माहितीय का, की शरीरात पाण्याची थोडीदेखील कमतरता होण्याने आपल्यावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. जेंव्हा आपल्या पिण्याच्या पाण्यापेक्षा अधिक पाणी शरीराबाहेर पडतं (लघवीवाटे, घामावाटे, उलटीवाटे अथवा जुलाब झाल्यावर) तेंव्हा सामान्यत:, डिहायड्रेशन होतं.

जर ही समस्या वेळीच दूर केली गेली नाही तर परिस्थिती अधिकच बिकट होऊ शकते. त्यामुळेच, जेंव्हा केंव्हा शरीरात डिहायड्रेशनची परिस्थिती उद्भवते, तेंव्हा त्याला फक्त पाणी नाही तर त्याला ORS दिलं जातं. आपल्या शरीरात निर्माण झालेल्या पाण्याची कमतरता ORS मुळे त्वरित दूर केली जाते. ORS च्या याच गुणवैशिष्ट्यामुळे त्याला 'Life Saving Solution' असंही म्हटलं जातं.

पाण्याची कमतरता मृत्यूला आमंत्रण देऊ शकते

जपानच्या Otsuka Pharmaceutical Company ने दिलेल्या माहितीनुसार, जेंव्हा आपल्या शरीरात निव्वळ दोन टक्के पाण्याची जरी कमतरता निर्माण होते, तेंव्हा त्या आपल्याला तहान लागल्याची भावना निर्माण होते. जेंव्हा आपल्या शरीरात तीन टक्के पाण्याची कमतरता निर्माण होते, तेंव्हा आपली ही तहान अधिक तीव्र होते. याशिवाय, आपलं मन चंचल व्हायला सुरु होतं आणि आपली भूक सुद्धा उडून जाते.

जेंव्हा ही कमतरता आणखी वाढून चार टक्क्यांवर जाते तेंव्हा आपल्या शरीराची त्वचा लालसर व्हायला सुरुवात होते तसेच आपल्या शरीराचे तापमान देखील वाढायला सुरुवात होते. थकवा वाढतो, चिडचिड वाढते तसेच आपल्या शरीरातील लघवीचे प्रमाण देखील घटतं. जेंव्हा यापुढेही ही पातळी सरकते आणि शरीरात पाच टक्के पाण्याची कमतरता निर्माण होते, तेंव्हा आपल्याला डोकेदुखी व्हायला लागते आपल्याला ताप यायला लागतो. जेंव्हा हे प्रकरण आणखी पुढे सरकतं आणि पाण्याची ही कमतरता पाच ते आठ टक्क्यांच्या दरम्यान पोहोचते, तेंव्हा फेफरे येऊन शरीर बेशुद्धावस्थेत जातं. जेंव्हा पाण्याचं कमतरतेचं हे प्रमाण 20 टक्क्यांवर जातं तेंव्हा अशा परिस्थितीत आपला मृत्यू होण्याची देखील शक्यता निर्माण होते. यापुढील प्रत्येकी एक टक्क्याची कमतरता माणसाला मृत्यूच्या दिशेने घेऊन जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam: "पवारांनी काँग्रेसकडं प्रस्तावही ठेवला होता की, सुप्रिया सुळेंना..."; विलिनीकरणाच्या विधानावर निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

Loksabha election 2024 : ''...तर हे राम मंदिराला कुलूप ठोकतील'', अमित शाह नेमकं काय म्हणाले?

Share Market Closing: शेअर बाजार आजही सपाट बंद; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये रिकव्हरी, कोणते शेअर्स तेजीत?

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Latest Marathi News Live Update : पवईत ४ कोटी ७० लाखांची रोकड पकडली

SCROLL FOR NEXT