Live to Laugh
Live to Laugh Sakal
health-fitness-wellness

हसण्यासाठी जगा : ‘स्पीड’ जगण्याचा, मनाचा!

मकरंद टिल्लू

‘दुपट्या’मध्ये गुंडाळून ठेवलेलं लहान बाळ, लुकलुकत्या डोळ्यांनी जग पाहत राहतं.  जे दिसतं, तेवढीच त्याच्यासाठी जगाची हालचाल असते. हळूहळू बाळ हात पाय उडवतं. पालथं पडतं, रांगतं, बसतं, चालायला लागतं, पळायला लागतं. या प्रत्येक टप्प्यानुसार त्याच्यासाठी जगाचा वेग वाढायला लागतो. आपण म्हणतो ‘जगाचा स्पीड वाढला आहे’.

सकाळी साडेनऊ वाजता ऑफिसला पोचण्यासाठी घरातून बाहेर पडणाऱ्या व्यक्तीची लगबग सुरू होते. घरातून नऊ वाजता ‘टू व्हीलर’वरून बाहेर पडलेली व्यक्ती जागोजागी ट्रॅफिक जाम बघून वैतागते. लवकर पोहोचण्यासाठी स्पीड वाढवण्याचा प्रयत्न करते. गर्दीमुळे जमत नाही.  मनाशी ठरवते. ‘जगण्याचा स्पीड’ अजून वाढवायला हवा.

वार्षिक परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या जातात. एक दिवस विद्यार्थ्यांना कळवलं जातं ‘ऑनलाइन परीक्षा अमुक अमुक तारखेला आहेत.’  मग विद्यार्थ्यांची अभ्यास वेळेत पूर्ण करण्यासाठी धावपळ चालू होते. मनामध्ये येतं ‘स्पीड वाढवायला हवा.’

घरामध्ये एखादा समारंभ ठरलेला असतो.  तयारी सुरू असते,  पण  मुहूर्ताचा दिवस जवळ येतो, तसं ‘ खूप गोष्टी करायच्या राहिल्या आहेत’ असं मनात वाटायला लागतं. अस्वस्थता वाढते.  मनात येतं ‘स्पीड वाढवायला हवा’.

कॉर्पोरेशन टॅक्स, इन्कम टॅक्स, जीएसटी अशा विविध गोष्टींच्या तारखा अगोदरच जाहीर केलेल्या असतात.  शेवटची तारीख जवळ आल्यावर लोकांची लगबग सुरू होते. ‘वेळ अपुरा पडतोय’ असं वाटायला लागतं. शेवटच्या तारखेला रांगा लागतात. तेव्हा मनात येतं, ‘स्पीड वाढवायला हवा’. 

वरील उदाहरणांकडे त्रयस्थपणे पाहिल्यावर लक्षात येईल, की ऑफिसला जाण्यासाठी सकाळी नऊऐवजी पावणेनऊ वाजता ती व्यक्ती निघाली, तर निवांतपणे वेळेत पोहचू शकते.  अभ्यास वेळच्या वेळी करत गेलेल्या विद्यार्थ्यांना शेवटच्या आठवड्यात पळापळ करावी लागत नाही. ‘प्रॉपर्टी टॅक्स’ पहिल्याच दिवशी कोणी भरायला गेला, तर सुहास्यवदनाने स्वागत केलं जाईल. कारण तेव्हा गर्दीच नसते.

सहज आठवून बघा. तुम्ही बसमध्ये खिडकीपाशी बसलेले आहात.  अशावेळी बाहेर बघताना लहान मुलं ओरडतात ‘ते बघ झाडं पळतायत.’  खरंतर  झाडं आहे तिथंच उभी असतात.  बसमधली व्यक्ती स्वतः वेगाने पुढं जात असते. म्हणून तिला झाडं पळाल्यासारखी वाटतात. 

त्याचप्रमाणं तुमच्या आमच्या आयुष्यातही बाहेरचं विश्व स्थिर आहे. आपल्या मनातलं विश्व पळायला लागलं, की जग पळत असल्याचा आपल्याला भास होतो. मग आपण आणखी वेग वाढवण्याचा प्रयत्न करतो.  तेव्हा जगदेखील आणखी वेगाने पळाल्याचा भास होतो, मग व्यक्ती जगण्याला स्पीड देण्याच्या नादात आपल्या जगण्यावरचा ताबा गमावत जाते. त्यातून मनातली अस्वस्थता वाढते. आपण मागे तर पडणार नाही ना, अशी भीती वाटायला लागते. ‘स्पीड वाढविण्याची नाही, तर मन स्थिर करण्याची!’ गरज आहे. एखाद्या डब्यात तुम्ही काही मणी टाका.  तो डबा हलवला, की आतले मणी दिशाहीनपणे आतल्या आत हलत राहतात. आपल्या शरीराच्या डब्यात, आपल्या मनातल्या भावना दिशाहीनपणे हलत राहतात. आपल्या मनाला उगाचच आपण ‘बिझी’ आहोत असं वाटत राहतं. त्यामध्ये नेमकं जे करायचा आहे ते राहून जातं. 

मनाला स्थिर करण्याची ताकद वाढली, तर भावनांचा आवेग कमी होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT