Akshit-Sukheja
Akshit-Sukheja 
health-fitness-wellness

माझा फिटनेस : माझे शरीरच माझा गुरु

अक्षित सुखिजा, अभिनेता

तुम्हाला आतून आनंदी वाटत असल्यास तुम्ही कशानेही अस्वस्थ होणार नाही आणि तुमचे मन शांत असल्यास तुम्ही निरोगी असाल व छान काम कराल.

चांगले खाणे, व्यायाम करणे आणि पुरेशी झोप घेणे, हे निरोगी राहण्याचे मार्ग आहेत. तुमचे विचार तुमच्या जीवनाची गुणवत्ता ठरवितात, असे म्हटले जाते आणि हाच मंत्र मी पाळतो. नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करण्याचा, जास्त विचार करणे टाळण्याचा आणि सकारात्मक विचार करणाऱ्या व तसे जीवन जगणाऱ्या लोकांसोबत राहण्याचा मी प्रयत्न करतो. मी क्वचित जंक फूड खातो.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

मला माझ्या आईच्या हातचे जेवण जास्त आवडते. मी तीन वर्षांपासून अभिनय क्षेत्रामध्ये काम करत आहे; पण मी दररोज जीमला जात नाही. सध्या कोरोनामुळे घरात असल्याने व्यायामाचे तेच वेळापत्रक पाळत आहे. योग्य आहार, रोजचा व्यायाम नियमित करणे, योग्य हालचाली करणे आणि पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे. तुमच्या इच्छेनुसार शरीराचा आकार मिळविण्याचा हा एकमेव मार्ग आहे. मला जीमचे मूलभूत ज्ञान आहे. माझ्या प्रशिक्षकांकडून मी नेहमीच थोडेफार मार्गदर्शन व मदत घेत असतो. मी ध्यानधारणा करतो, संगीत ऐकतो किंवा एक डुलकी काढतो. त्यामुळे माझे मन ताजे होण्यास मदत होते. कलर्स हिंदी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘शुभारंभ’ या मालिकेसाठी मी वजन कमी केले आहे. यामध्ये मी राजाची भूमिका साकारत आहे. फिटनेसबाबत माझा कोणी गुरू नाही किंवा मी कोणत्याही गुरूला फॉलो करत नाही. मी फक्त नेहमी फिटनेसचे व्हिडिओ पाहतो आणि माझ्या शरीराला योग्य असेल, त्याचेच पालन करतो. त्यामुळे माझे शरीर हाच माझा गुरू आहे. माझ्या शरीराच्या गरजेनुसार मी व्यायाम करतो. 
(शब्दांकन - अरुण सुर्वे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT