health-fitness-wellness

'पालक'च्या पानांमधील पेशींच्या जाळ्याचा वापर करून वैज्ञानिकांनी बनवलं मिनी हृदय

सुमित बागुल

जग बदलतंय. नवनवीन आणि अचाट करणारी संशोधने केली जातायत. या संशोधनांच्या मदतीने माणसाचं जीवनमान वाढण्यास मदत होऊ शकते. अनेक संशोधकांच्या मते येत्या काही काळात असे प्रयोग यशस्वी होतील ज्याने माणसाचं वयोमान वाढू शकणार आहे. त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रयोग. वैज्ञानिकांना कार्यरत मानवी हृदयाचा स्नायू तयार करण्यासाठी पालकाच्या पानांपासून एक नवीन शोध लागलाय. यामार्फत खराब झालेल्या अवयवांच्या दुरुस्तीच्या तसेच दीर्घकाळ भेडसावणाऱ्या समस्या सोडवणे देखील शक्य होऊ शकते. पालकाच्या पानांचा वापर मानवी हृदयाच्या स्नायूसारखा कसा करावा याचा शुद्ध वैज्ञानिकांना लागलाय, या शोधाने कदाचित खराब झालेल्या अवयवांची दुरुस्ती किंवा दीर्घकाळ भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यात मदत होऊ शकते. 

नुकताच 'बायोमटेरियल' या वैद्यकीय जर्नलमध्ये एक लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये टिश्यू इंजिनिअरिंगमध्ये अडथळा ठरणारी आणि मानवी हृदयातील रक्तवहिन्यासंबंधी प्रणाली विकसित करण्याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती नमूद केली आहे. 

वैज्ञानिकांनी यापूर्वीच थ्रीडी प्रिंटिंगसारख्या पद्धतींचा वापरकरून लॅबमध्ये मोठ्या प्रमाणात मानवी ऊतक (tissues) तयार केले आहेत. मात्र ऊतींच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या लहान आणि नाजूक रक्तवाहिन्या बनवणे आणि वाढविणे खूप कठीण आहे.मॅसेच्युसेट्समधील वॉरचेस्टर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थी जोशुआ गरश्लाक एका व्हिडीओमध्ये म्हणतात की, “ऊतक अभियांत्रिकीसाठी ( tissue engineering ) आड येणारा प्रमुख घटक म्हणजे संवहनी जाळ्याचा (vascular network) आभाव. या अभावामुळे रक्तवहिन्यामधील अनेक टिश्यूजचा मृत्यू होतो. 

पालकाच्या पानांच्या मुख्य लक्षणांपैकी एक म्हणजे त्यातील अतिशय सूक्ष्म नसाचे ब्रँचिंग नेटवर्क, जे त्याच्या पेशींमध्ये पाणी आणि पोषक तत्व पोहोचवतात. मानवी ऊतकांमधून (human tissue) रक्त ज्याप्रकारे प्रवाहित होते, त्यासाठी वैज्ञानिकांनी आता वनस्पतींच्या नसांचा जाळ्याचा वापर केलाय. या संशोधनात पालकाच्या पानातून त्यातील पेशी वेगळ्या करण्याचं महत्त्वाचं काम होतं. पेशी वेगळ्या केल्यानंतर सेल्युलोजपासून बनविलेले जाळे संशोधकांना मिळू शकलं.  

सेल्युलोजचे जाळे हे बायोकम्पॅटिबलअसून त्याचा उपयोग विविध प्रकारच्या पुनरुत्पादक मेडिसनल प्रयोगांमध्ये केला जातो. ज्यात कर्टीलाइज टिश्यू (cartilage tissue) इंजिनिअरिंग, बोन टिश्यू इंजिनिअरिंग आणि जखमांच्या उपचारासाठी त्याचा वापर होतो, असं  लेखकाने म्हंटल आहे. 

त्यानंतर वैज्ञानिकांनी उर्वरित वनस्पती जाळ्यांना मानवी पेशींमध्ये बुडवून पहिले, जेणेकरून पालकांच्या पानातील नसांमध्ये आणि आसपासच्या अतिसूक्ष्म नसांच्या जाळ्यात टिशूज वाढू शकतील. या पालकाच्या पानाचे लहान हृदय तयार झाल्यावर वैज्ञानिकांच्या चमूने त्यातून काही द्रव्य आणि मायक्रोबीड पाठवलेत. याचा उद्देश या प्रणालीद्वारे रक्त पेशी वाहून नेल्या जाऊ शकतात का हे तपासण्यासाठी केले गेला.   

या प्रयोगाचा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे, ज्यांना हृदयविकाराचा झटका आलाय किंवा ज्यांना हृदयाशी संबंधित इतर समस्यांचा सामना करावा लागला आहे अशांचं हृदय आकुंचित होण्यापासून रोखता येऊ शकतं का किंवा त्यातील डॅमेज टिशूज पुन्हा पूर्ववत करता येऊ शकतात का हे पाहणे होतं. रक्तवाहिन्यांप्रमाणेच सुधारित पानांमधील नसा या बदललेल्या टिशूजमध्ये ऑक्सिजन पोहोचवतात, जे की नवीन हृदय तयार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. 

वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, शरीरात वेगवेगळ्या ऊतकांची दुरुस्ती करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींच्या पानांचा वापर केला जाऊ शकतो. . उदाहरणार्थ लाकडातील पेशींचा वापर करून आपण हाडांमधील दोष नष्ट करू शकतो. दरम्यान, याबाबत अजून खूप काम करणे बाकी आहे. मात्र आतापर्यंत ज्या बाबी समोर आल्या आहेत त्या देखील अतिशय महत्त्वाच्या आहेत, असं वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

scientist have made mini heart with the help of spinach leaf

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT