Sri Sri Ravi Shankar
Sri Sri Ravi Shankar sakal
health-fitness-wellness

चेतना तरंग : वैभव आणि वैराग्य

श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग

वैभव आणि वैराग्य हे परस्परविरोधी आहेत आणि ते एकत्र नांदू शकत नाहीत, असे बहुतांशी मानले जाते.

वैभव आणि वैराग्य हे परस्परविरोधी आहेत आणि ते एकत्र नांदू शकत नाहीत, असे बहुतांशी मानले जाते. वैभव आणि विलास हे जर वैराग्याच्या भावनेसह नसतील, तर असे वैभव किळसवाणे, श्रीमंतीचा माज दाखवणारे वाटते. अशा प्रकारचे वैभव कधी कुणाला सुख - समाधान अथवा तृप्ती देऊ शकत नाही, कारण ते उथळ असते. याचप्रमाणे, ज्या वैराग्याला वैभवाचा तिटकारा असेल, ते वैराग्यही अतिशय दुबळे असते. कारण खऱ्या वैराग्याला वैभवाचा प्रभाव जाणवतदेखील नाही.

वैराग्याच्या भावनेसह असलेले वैभव हे खरे, शाश्वत आणि अस्सल वैभव होय. जे लोक वैभवाच्या मागे आंधळे होऊन धावत असतात, त्यांचे जीवन खूप उथळ आणि पोकळ राहते. सिनेमातील प्रसिद्ध अभिनेते, राजकीय नेते, धर्मगुरू अशा लोकाभिमुख व्यक्ती आपल्या इभ्रतीला आणि वैभवाला सांभाळून ठेवण्याच्या प्रयत्नात असतात, पण ते सगळे असफल होतात. तुम्ही जर वैभवाच्या मागे धावाल, तर तुम्हाला दुःखच प्राप्त होईल. तुम्ही जर वैराग्याच्या भावनेत राहाल, तर मात्र वैभव तुमच्याकडे येईल.

तुम्हाला वैभवाचे भय वाटत असेल, तर तुम्ही वैराग्यात स्थिर नाही आहात, हे समजून घ्या. भारतामध्ये अनेक साधू वैभवापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतात. वैभवात रमल्याने ते आपले वैराग्य घालवून बसतील आणि या संसाराच्या सर्कसमध्ये अडकून पडतील, अशी त्यांना भीती असते. नाहीतरी वैराग्यामध्ये इतका अतीव आनंद असतो, की ते त्यातही गुरफटून जातात. आपले वैराग्य हरवेल याची भीती त्यांना सतत असते. मग ती एकाग्रता आणि तृप्तीही विरून जाईल याचे भय त्यांना सतावते. म्हणून ते वैभवापासून दूर पळू पाहतात. पण अशा प्रकारचे वैराग्य अतिशय दुबळे असते.

वैराग्य ही आपल्या अस्तित्वाचीच एक स्थिती असते, तर वैभव ही आपल्या अस्तित्वाभोवती घडणारी घटना, बाह्य स्थिती आहे. खरे, अस्सल वैराग्य कधीही कसल्याही वैभवाने ना झाकोळले जाईल, ना लुप्त होऊ शकेल.

खरे तर अस्सल वैराग्य हेच वैभवपूर्ण आहे!

आणि वैराग्य हेच खरेखुरे वैभव आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT