Yoga
Yoga Sakal
health-fitness-wellness

चेतना तरंग : प्रामाणिकपणा आणि आशीर्वाद

श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग

अनेक जण आशीर्वादाची अपेक्षा करतात, पण त्यातील काही जणांनाच तो मिळतो. असे का?

प्रश्न - अनेक जण आशीर्वादाची अपेक्षा करतात, पण त्यातील काही जणांनाच तो मिळतो. असे का?

श्रीश्री - आशीर्वाद देणारा सदैव सर्वांना आशीर्वाद देत असतो, पण घेणारा तिथे नसतो! – घेणारा प्रत्येक जण प्रामाणिक नसतो. दाता नेहमीच मुक्त हस्ताने देत असतो, पण घेणारा प्रामाणिकपणे घ्यायला तयार हवा. प्रामाणिकतेमध्ये आशीर्वाद मिळवण्याची पात्रता असते आणि कुठल्याही समयी प्रामाणिक राहून आशीर्वाद पावण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकास आहे.

प्रश्न - काही लोक फक्त काही वेळाच प्रामाणिक का असतात?

श्रीश्री - सदैव प्रामाणिक राहिल्याने काही सामान्य सुखांना मुकावे लागेल, असा त्यांना भ्रम असतो. सुखांच्या हव्यासापायी हे लोक अप्रामाणिक बनतात. पण जर तुम्ही सदैव प्रामाणिक असाल, तर हव्यास न ठेवताही ही सर्व सुखे भोगता येतात. गरीब लोक अन्नासाठी वणवण करतात. जे आपल्याकडील अन्न वाटतात, ते लोक श्रीमंत. त्याहून अधिक श्रीमंत ते असतात जे आपली शक्तीदेखील वाटू पाहतात. आणखी अधिक श्रीमंत ते जे आपला लौकिकसुद्धा वाटतात आणि सर्वांत अधिक श्रीमंत ते आहेत जे स्वतःलाच अर्पण करतात. स्वतःकडे गोळा करून ठेवण्याच्या क्षमतेपेक्षा दान करण्याची क्षमता हे खरे श्रीमंतीचे लक्षण आहे.

प्रामाणिकता म्हणजे आपल्या अंतरात्म्याच्या जाणिवेत असणे.

मौन उत्सव

ज्या ईश्वराने तुम्हाला सर्व काही दिले आहे, त्यानेच तुम्हास स्वातंत्र्यदेखील बहाल केले आहे. त्या स्वातंत्र्याचा सन्मान करा आणि जे सर्व तुम्हाला मिळाले आहे त्याचा योग्य उपयोग करा.

  • तुमचे संकल्प आणि तुमच्या इच्छा तुम्हाला ईश्वरापासून अलग ठेवत असतात.

  • त्या सर्व संकल्पांना आणि इच्छांना ईश्वरचरणी अर्पण करा. मग तुम्हीच ईश्वर आहात, तुम्ही दैवी शक्ती आहात? मग तुम्ही मुक्त आहात, सर्वसंपन्न आहात.

  • तुमचे मन तुमच्या मालकीचे नाहीच. त्याला दोष देऊ नका. त्याला त्या विशाल चैतन्याशी एकरूप होऊ द्या.

  • सापेक्षतेमध्ये प्रयासाची आवश्यकता असते. निरपेक्ष हे प्रयासहीन असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT