Vasundhara-Talware 
health-fitness-wellness

योगा लाईफस्टाईल : योगामध्ये गुरूचे महत्त्व

वसुंधरा तलवारे

आपण मागील भागात योगशास्त्राचा उगम कसा झाला याबद्दल थोडक्यात पाहिले. आज आणखी थोडे पुढे जाऊन योगाचा उपयोग समाजात कशाप्रकारे सुरू झाला याबद्दल जाणून घेऊयात. स्वामी विवेकानंद जेव्हा श्री रामकृष्णांना  सर्वप्रथम भेटले, तेव्हा त्यांनी पहिला प्रश्न विचारला, ‘गुरूदेव, तुम्ही देव पाहिला आहे का किंवा तसा अनुभव घेतला आहे का?’ श्री रामकृष्ण यांचे उत्तर होते, ‘होय, मी देव पाहिला आहे. मी तुला आता जसे माझ्यासमोर पाहतो आहे, तसे देवालाही पाहिले आहे, फक्त देव मला अधिक स्पष्ट दिसला.’ आपण देवाला पाहू शकतो, आपण त्याच्याशी संवादही साधू शकतो. पण देव हवा कोणाला आहे? लोक आपली पत्नी, मुले, संपत्ती, घर-दार यांसाठी अश्रू ढाळतात, मात्र देव दिसावा यासाठी कोणीही डोळे ओले करीत नाही. एखाद्याने प्रामाणिकपणे देव दिसावा यासाठी अश्रू ढाळले, प्रार्थना केली तर त्याला देव नक्की दिसेल. 

स्वामी विवेकानंद श्री रामकृष्ण परमहंसाबरोबरच्या पहिल्याच भेटीत खूप प्रभावित झाले व ते रोज त्यांना भेटण्यासाठी जाऊ लागले. आपण देव पाहिलेल्या किंवा तसा अनुभव घेतलेल्या व्यक्तीला भेटतो आहोत, याचे त्यांना मोठा अप्रूप वाटत होते. त्यांना माहिती होते, की रामकृष्णांचे वाक्य हे केवळ शब्द नसून, तो अंतर्मनातून आलेला आवज आहे. स्वामी विवेकानंदांनी (तेव्हाचे नरेंद्र) हाच प्रश्न देवेंद्रनाथ टागोर यांनीही विचारला होता, मात्र त्यांनी उत्तर देण्याचे टाळले व केवळ विवेकानंदांच्या जिज्ञासू वृत्तीचे कौतुक केले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपल्या मूळ मुद्याकडे परत येऊयात. शिकण्याची इच्छा असणारा विद्यार्थी अशा शिक्षकाच्या शोधात असतो, ज्याच्याकडे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर मोठा अनुभव आहे. कोणताही अनुभव नसताना केवळ उपदेश करणारा गुरू कोणालाच नको असतो. हे चित्र आता बदलते आहे. विद्यार्थांना आता त्वरित परिणाम हवे असतात, त्यामुळे त्यांना त्यांच्या मर्यादित अपेक्षा पूर्ण करणारेच शिक्षक मिळतात. सध्या होणारे बदल बाहेरून आत नव्हे, तर आतून बाहेर होत आहेत. 

योगा मुलतः जगण्याचा व संस्कृतीचा अविभाज्य भाग होता. लोकांची बाह्य वागणूक त्यांच्या अतर्मुल्यांवर आधारित होती. लोकांची बाह्यवागणूक त्यांच्या आतील समजुतीचा परिणाम होता. बाह्य सत्यापेक्षा अंतर्गत सत्य अधिक महत्त्वाचे ठरते. योग शिकणवारा पहिले शिक्षक भगवान शंकर होते. त्याचबरोबर ८४ वर्षे तपामध्ये राहून शिवाचे नृत्य थांबण्याची वाट पाहणाऱ्या सप्तर्षीचेही आभार मानावे लागतील. आपण आज योग आणि त्याच्या फायद्यांचा आपल्या दैनंदिन आयुष्यात लाभ घेतो आहोत, ते या सर्व शिक्षकांमुळे, गुरूंमुळेच. त्यांनीच आपल्याला योगिक आयुष्य जगण्याचे सोपे मार्ग शिकवले व आपल्याला दिवस-रात्र योगिक आयुष्य जगायला शिकवले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Bar Strike : मद्यपींसाठी महत्त्वाची बातमी! राज्यभरातील बार उद्या राहणार बंद; HRAWI चा जाहीर पाठिंबा, काय आहे कारण?

Kolhapur : ए. एस. ट्रेडर्सच्या माध्यमातून कोल्हापूर व बेळगावातील गोरगरिबांना लुटायचा, पोलिसांनी ट्रॅप लावून मुख्य एजंटला केली अटक

Flight Cancellation:'तांत्रिक कारणामुळे गोव्यातून विमानाचे उड्डाण रद्द'; ५९ प्रवासी सोलापूर विमानतळावरून परतले; नाईट लॅंडिंग नसल्याने गैरसोय

Latest Marathi News Updates : मराठीबहुल मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना भेटणार; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचा निर्णय

Solapur: गावगाड्याच्या राजकारणाचा उडणार ‘धुरळा’; सोमवारी झेडपीची प्रारूप प्रभागरचना, मंगळवारी सरपंचाची आरक्षण सोडत

SCROLL FOR NEXT