Vasundhara-Talware
Vasundhara-Talware 
health-fitness-wellness

योगा लाइफस्टाइल : ...तरच कुंडलिनी जागृत राहील!

वसुंधरा तलवारे

आपण मागील भागात कुंडलिनी कशी जागृत करावी, त्यासाठीचे यम-नियम काय आहेत, याचा उहापोह केला. मी खूपच सुदैवी असल्याने 14 ते 15 वर्षांची असतानाच तंत्र योगामध्ये आकंठ बुडण्याची संधी मिळाली. त्यामुळे माझे लक्ष पूर्णपणे अंतर्मनाकडे केंद्रित झाले. मंत्र, सहस्रारावरची ध्यानधारण, ध्यानधारण व मंत्रपठणाच्या माध्यमातून प्रत्येक चक्राची सफाई करणे व प्रत्येक चक्रला मंत्रपठणाच्या माध्यमातून भेदण्याचे व त्यातून ब्राह्मणाबरोबर एकरूप होणे मला शक्य झाले. या प्रक्रियेत पुढे जाताना कोणत्याही एका चक्राबरोबर तुम्हा अडथळ्याचा सामना करावा लागल्यास तुम्हाला तेथून पुढे जाणे अशक्य होऊन बसते. त्यामुळे हे जाणून घेणे आवश्यक ठरते की, ते चक्र नक्की कशासाठी बनले आहे, ते अडथळा का बनले आहे व त्यानंतर त्याचे मूळ शोधून काढणे, भावनांचे शुद्धीकरण करणे, माफ करून पुढे जाणे, नकारात्मकता कमी करणे किंवा ती नष्ट करणे आवश्यक असते. यातून सेंट्रल चॅनेल उघडला जातो व त्यातून कुंडलिनी पुढच्या पातळीपर्यंत उत्क्रांत होते.

कुंडलिनी योगामध्ये पडण्याआधी तुम्ही योगातील आयुष्यात तुम्ही कोणते यम आणि नियम पाळता हे महत्त्वाचे ठरते. तुम्ही खोटे बोलणे, दुसऱ्याला फसवणे, चोरी करणे, साठेबाजी करणे, दुसऱ्याला दुखावणे, प्रत्येक गोष्टीचा उपयोग घेणे या गोष्टी एका बाजूला करणार आणि त्याचवेळी तुमची कुंडलिनी चक्रांच्या महामार्गाने वेगाने पुढे जाईल, अशी अपेक्षा कराल तर ते शक्य होणार नाही. तुम्ही तुमच्या प्रगतीची कायमच दुसऱ्याशी तुलना करणार, असंतुष्टता, द्वेष, अक्षमता, अपूर्णता स्वतःमध्ये बाळगणार आणि तुमची सुप्त आध्यात्मिक ऊर्जा आपोआपच वाढीस लागेल अशी अपेक्षा ठेवणार, असेही घडणार नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यासाठी तप, स्वअध्ययन, स्वशिक्षण, संपूर्ण समर्पण या माध्यमातून कुंडलिनी जागृत करण्याच्या दिशेने छोटी-छोटी पावले टाकवी लागतील आणि गोड झोपेतून तुम्ही जागे व्हाल. तुमच्या चक्रांचा तोल व्यवस्थित साधला गेलेला असल्यास व व्यवस्थित पद्धतीने फिरत असल्यास व कुंडलिनी त्यातून जात असल्यासच तुमच्या आयुष्यात समतोल साधला जातो.

योगिक आयुष्य जगण्यासाठी तुमच्यामध्ये हा समतोल असणे महत्त्वाचे आहे. तुम्हीही कितीही मंत्रोच्चारण करा, ध्यानधारण करा, आसने किंवा प्राणायाम करा, मात्र तुमची चक्रे एका दिशेत नसल्यास तुम्हाला मिळणारे फायदे अल्पकाळ टिकणारेच ठरतील. हे एका बाजूला सफाई करणे आणि दुसरीकडे पसारा करण्यासारखे आहे. आपण आपले आयुष्य आपल्याला ज्या स्तरापर्यंत पोचायचे आहे, तसे जगत नाही. कु़ंडलिनी कायम जागृत ठेवायची असल्यास हे सर्व टाळून योगिक आयुष्य जगा...

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: लॉकी फर्ग्युसनने तोडली रचिन-रहाणेची पार्टनरशीप, चेन्नईला तिसरा धक्का

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT