Yoga
Yoga Esakal
health-fitness-wellness

Yoga Diet Tips: योगासने करण्यापूर्वी अन् नंतर काय खावे,काय खाऊ नये?

सकाळ डिजिटल टीम

भारतात योगाला (Yoga) खूप महत्व आहे. प्राचीन काळापासून मानसिक, शारीरिक आणि अध्यात्मिक लेवलवर याचा अभ्यास करण्यात येत आहे. योगा केल्याने मन शांती तर लाभतेच शिवाय शरीर निरोगी राहते. कोरोना काळानंतर तर याची जास्त गरज जाणवून आली. योग करणारी व्यक्ती योगा न करणाऱ्या व्यक्तीपेक्षा अधिक निरोगी आणि आनंदी असते.अभिनेत्री शिल्पा शेट्टीला (Shilpa Shetty)पाहिल्या नंतर आपल्या लक्षात येईल.

योगासाठी विशेष साधने खरेदी करावी लागत नाहीत. फक्त नियमित योगा करायची मनाची तयारी झाली की झाल. पण योगा करताना थोडी तयारी करावी लागते. जस की आसने करत असताना तुमच लक्ष तुमच्या खाण्याकडेही असावे लागते. तुम्ही काय खाताय काय नाही हे खूप महत्वाचे आहे. आज तुम्हाला योगा करण्यापूर्वी आणि नंतर काय खावे याची माहिती देणार आहोत. ज्याचा तुम्हाला फायदाच होईल.

नाश्ता करा पण..

कोणताही व्यायाम हा सकाळी केलेला उत्तम असतो. मात्र काही गृहिणींना किंवा ऑफिस वर्क लवकर असणाऱ्यांना सकाळी योगा करणे शक्य होत नाही. अशावेळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेला योगासने करा. परंतु योगासने करण्यापूर्वी किमान अडीच तास आधी हलका नाश्ता करा. या नाश्त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज असणाऱ्या पदार्थाचा समावेश करा. यात भाज्या, सॅलड किंवा सूप खाऊ शकता. हे पचनास हलके असतात. मांसाहारासारखे जड पदार्थ शक्यतो टाळा.

खूप पाणी प्या

योगासने करण्यासाठी तुमचे शरीर हायड्रेटेड असणे महत्त्वाचे असते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कोणत्याही प्रकारचा व्यायाम करताना शरीराला खूप घाम येतो. त्याचप्रमाणे तुमचे शरीर चयापचय वाढवण्यासाठी पाण्यात असलेल्या इलेक्ट्रोलाइट्सचा वापर करतात ज्यामुळे तुमचा व्यायाम चांगला होतो. यासाठी शरीराला पुरेसे पाणी आवश्यक असते. तुम्ही दिवसभरात पाणी पिले पाहिजे.मात्र योगा करताना पाणी पिऊ नका. तसेच योगा झाल्यावर लगेच पाणी पिऊ नका.

केळी खाऊ शकता

केळामध्ये फायबरचे प्रमाण खूप असते. याचबरोबर पोटॅशियमचे प्रमाणही असते. केळामध्ये असलेले मॅग्नेशियम तुम्हाला स्नायूंच्या क्रॅम्पपासून वाचवण्यास मदत करतात.यामुळे तुम्ही केळी खाऊ शकता. याचा फायदा तुम्हाला योगासने करताना होतो.

योगासने करताना आधी काहीही खाऊ नका

योगासन करण्यापूर्वी सुमारे दोन तास काहीही खाऊ नका. खाल्ल्या- खाल्ल्या लगेच जर तुम्ही योगासने करण्यास सुरुवात केली तर तुम्हाला पोटदुखी, मळमळ, पोट फुगणे याचा त्रास होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT