- डॉ. हंसा योगेंद्र
5 Ways to Stop Overthinking : को णतीही गोष्ट अती केली तर वाईटच असते. तोच प्रकार विचार करण्याबाबतही लागू होतो. अतिविचार कसे थांबवायचे आणि आनंदी आणि शांत जीवन कसे जगायचे याचे ५ मार्ग पुढीलप्रमाणे आहेत.
जागरूकता आणि स्वीकृती
कोणत्याही प्रकारचा बदल घडवून आणण्याचा पहिला आणि मुख्य मार्ग म्हणजे समस्येच्या व्याप्तीची जाणीव असणे आणि ती स्वीकारणे. तुमच्या मनाला अतिविचार करायला लावणाऱ्या गोष्टींबद्दल स्वतःला संवेदनशील करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला एक पाऊल मागे घ्यावे लागेल आणि तुम्ही ते कसे दुरुस्त करू शकता किंवा त्यापासून दूर राहू शकता याचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. अर्थात हे ओळखण्यासाठी किंवा समजण्यासाठी तुम्ही सक्षम असले पाहिजे.
वर्तमानात जगा
आपण वेगवेगळ्या दिशांची चिंता करतो तेव्हा आपले मन वेगवेगळ्या दिशांनी खेचले जाते. तुम्ही भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा सातत्याने विचार करत असाल आणि भविष्यात काय होईल याची चिंता करत असल्यास तुमचे मन अतिविचार आणि जास्त काम करण्यास भाग पाडत असते. ‘होऊ शकतील’ अशा सर्व नकारात्मक गोष्टींवर तुमची ऊर्जा केंद्रित करण्याऐवजी, वर्तमान क्षणात जगून सध्या तुमच्या हातात त्यावर लक्ष केंद्रित करा.
नकारात्मक विचार बदला
पतंजली ऋषींनी मन प्रसन्न आणि शांत ठेवण्याचा सोपा उपाय सांगितला आहे. जेव्हा जेव्हा मनात नकारात्मक विचार येत असल्याची तुम्हाला जाणीव होते तेव्हा त्यांना सकारात्मक विचारांनी बदला. आपण अनुलोम विलोम किंवा अगदी भ्रामरीसारख्या प्राणायामाचा सराव करतो, तेव्हा आपला श्वास मंद करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतो. सतत अतिविचार केल्यामुळे बिघडलेला श्वास प्राणायामाच्या सरावाने हळूहळू नियंत्रणात येतो.
अपूर्णतेमध्ये परिपूर्णता शोधणे
योग म्हणतो की आपण शिकण्याच्या टप्प्याचाही आनंद घेतला पाहिजे. तुम्ही कोणतीही आसने करा, ती तुमच्या दृष्टीने परिपूर्ण म्हणजे शंभर टक्क्यांसह करा. शेजारी बसलेल्या व्यक्तीशी किंवा अगदी शिक्षकाशी कधीही तुलना करू नका. तुमच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवा आणि त्याचा आनंद घ्या. केवळ परिपूर्णतेची प्रतीक्षा केल्याने ती मिळणार नाही. त्याऐवजी शिकत राहण्याची प्रक्रिया निरंतर ठेवा.
भीतीला दूर ठेवा
नवीन गोष्टी करून पाहण्याची आपल्याला नेहमीच भीती वाटते. आपली छोटीशी भीतीही आपल्याला नवीन आव्हानांचा प्रयोग करण्यापासून रोखते. इथेच अतिविचार आपल्यावर अधिराज्य गाजवायला सुरूवात करते. योगिक क्रियांच्या तंत्रांचा सराव करतो, तेव्हा अनेक विद्यार्थ्यांच्या मनात भीती असते. तुमच्या मनातील कोणत्याही प्रकारची भीती काढून टाकण्यासाठी जलनीतीचा सोपा योग साधा. वाट्याला येणारी प्रत्येक संधी तुम्हाला पुन्हा उभारी देण्यासाठी असते हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. कोणत्याही परिस्थितीत भीतीला तुमच्यावर कब्जा करू देऊ नका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.