Abdominal pain
Abdominal pain sakal
आरोग्य

तर काय?

सकाळ वृत्तसेवा

मी सकाळच्या फॅमिली डॉक्टर पुरवणीचा नियमित वाचक आहे. मला त्यात सांगितलेल्या गोष्टींचा खूप फायदा होतो. मी गेले ५-६ महिने पोटदुखीच्या त्रासाने त्रस्त आहे. जेवल्यावर पोट दुखायला लागते. बऱ्याच तपासण्या केल्या, औषधे केली पण कशानेही फरक पडत नाही. कितीही हलका आहार घेतला, तळकट-तिखट वर्ज्य केले तरी त्रास होतो. काही मार्गदर्शन करता येईल का?

- श्री जगन्नाथ, पुणे

नेहमी पोट दुखत असेल व तपासण्यांत काही आढळून आले नसले तर आयुर्वेदाच्या तज्ज्ञांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे उत्तम. पोट दुखण्याचीही कारणे अनेक असू शकतात. नाडीपरीक्षण व प्रत्यक्ष प्रश्र्न विचारून पोट दुखण्याचे कारण समजू शकेल.

पण तरीही पचन व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने रोज खाण्यामध्ये हलक्या गोष्टी ठेवाव्यात. शक्य असल्यास थोडे दिवस गहू पूर्णपण वर्ज्य करावा. सध्या अनेकांच्या बाबतीत ग्लुटेन इन्टॉलरन्स असे निदान होते आहे. याचा अर्थ गहू आयुष्यभर बंद करावा असा नाही, तर थोडे दिवस गहू बंद करून फरक पडत असला तर गहू पचविण्यासाठी काय करता येईल हे पाहता येईल. लाल तांदूळ, ज्वारी, नाचणी, कांगू, मुगाची डाळ वगैरेंचा आहारात समावेश असावा. शक्यतो फळभाज्या खाणे अधिक चांगले राहील.

जेवणाच्या शेवटी ताजे दही घुसळून केलेले वाटीभर ताक घेणे उत्तम. काळे मीठ व जिरे पूड घालून ताक घेतल्यास पचनाला अजूनच फायदा होऊ शकेल. रोज रात्री झोपण्याआधी संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेल किंवा संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेलासारखे तेल पोटाला हलक्या हाताने लावावे. जेवण्यापूर्वी अशा प्रकारे तेल लावण्याचा फायदा होऊ शकतो. प्रकृती पित्ताची नसली तर गरम पाण्याचा दिनचर्येत समावेश करणे अधिक उत्तम ठरेल.

हिवाळ्यात थंड पाण्याने स्नान करणे योग्य ठरेल का? आमच्या घरी या मुद्द्यावरून बरेच वेळा चर्चा होत असते. काही जुन्या मंडळींच्या मते बाराही महिने थंड पाण्याने स्नान करणे उत्तम असते. मला गरम पाण्याने स्नान करायला आवडते. काय करावे?

- अनिता भोर

स्नानाकरता कोमट पाणी घ्यावे असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. जे पाणी फार गार नसेल व फार गरम नसेल अशा प्रकारचे पाणी स्नानाकरता घेणे उत्तम. आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा १-२ डिग्री अधिक तापमानाचे पाणी म्हणजे साधारण ४० डिग्री सेंटिग्रेड ताप मानाचे पाणी स्नानाला घेणे उत्तम. थंडी असली तरी फार गरम पाण्याने स्नान करणे त्वचेच्या आरोग्यासाठी हितकर नसते, तसेच थंडीच्या दिवसात गार पाण्याने स्नान केल्यास शरीरात वातवृद्धी होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे थंडीत व पावसाळ्यात शक्यतो कोमट पाण्याने स्नान करणे जास्त उचित.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT