क्विनोआचे फायदे Esakal
आरोग्य

Weight Loss सोबतच Quinoaचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे, आजच आहारात ट्राय करा क्विनोआच्या रेसिपी

अनेक पोषक तत्वांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये क्विनोआचं सेवन वाढू लागलं आहे. मुख्यत्वे अमेरिकेतील हे पिक आता जगभरात प्रसिद्ध होवू लागलं आहे

Kirti Wadkar

गेल्या काही वर्षांमध्ये क्विनोआ हे धान्य मोठ्या प्रमाणात प्रचलित झालं आहे. यामागचं कारण आहे ते म्हणजे त्याचे फायदे. खास करून वेटलॉस डाएटमध्ये Weight Loss Diet गेल्या काही वर्षात क्विनोआचा मोठ्य़ा प्रमाणात समावेश केला जात आहे. Diet Tips Marathi try Quinoa recipes for keeping good health

खरं तर क्विनोआ Quinoa चे केवळ वजन कमी करण्यासोबतच आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. अगदी मधूमेही रुग्णांबरोबरच हाडं मजबूत Bone Health करण्यासाठी देखील क्विनोआचं सेवन उपयुक्त ठरतं. क्विनोओला सुपरफूड Superfood मानलं जात. कारण क्निनोआ हे फायबर, खनिजं, प्रोटीन आणि व्हिटॅमिन तसंच एमिनो ऍसिडचं एक उत्तम स्त्रोत आहे.

क्विनोआमध्ये इतर धान्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात प्रोटीन उपलब्ध असत. तसंच यात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, फॉलिक ऍसिड, मॅग्नेशियम, फॉस्फरस, आयरन मुबलक प्रमाणात आढळतं. तसंच शाकाहारी व्यक्तींसाठी गरजेचं असलेलं लायसिन ऍसिडदेखील यामध्ये उपलब्ध असतं.

अनेक पोषक तत्वांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये क्विनोआचं सेवन वाढू लागलं आहे. मुख्यत्वे अमेरिकेतील हे पिक आता जगभरात प्रसिद्ध होवू लागलं आहे. खास करून मुबलक फायबर आणि कमी कॅलरीज असल्यानं वजन कमी करण्यासाठी क्विनोआचा आहारामध्ये समावेश वाढू लागला आहे. जाणून घेऊयात क्निनोआचे आरोग्यासाठी इतर फायदे. Quinoa Benefits

एनिमियाची समस्या होईल दूर- महिलांमध्ये एनिमियाची म्हणजेच शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होते. क्विनोओमुळे ही समस्या कमी होऊ शकते. क्विनोआमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असल्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते.

हृदयासाठी फायदेशीर- क्विनोओमध्ये निकोटीफ्लोरिन आणि रुटीन सारखे फायटोकेमिकल्स आढळतात. यामुळे नैसर्गिकरित्या रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि हृदय निरोगी राहतं. Quinoa for Healthy Heart

हे देखिल वाचा-

हाडं होतील मजबूत- क्विनोआमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम तसंच फॉस्फरस, मॅगनीज अशी पोषक त्तव असतात ज्यामुळे हाडं मजबूत होण्यास आणि हाडांची घनता वाढण्यास मदत होते.

रक्तातील साखर नियंत्रणात राहते- मधुमेहाची समस्या असलेल्या व्यक्ती आहारामध्ये क्विनोआचा समावेश करू शकतात. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी- वजन कमी करण्यासाठी क्विनोआ भातासाठी एक चांगला पर्याय ठरु शकतो. यामध्ये असलेल्या प्रोटीनमुळे चयापचय क्रिया सुधारते. ज्यामुळे फॅट जलतगतीने बर्न होण्यास मदत होते. तसंच यातील फायबरमुळे दीर्घकाळ पोट भरलेलं राहत असल्याने सतत खाण्याची इच्छा होत नाही आणि वजन निंत्रणात राहतं. Quinoa For Weight loss

अशा प्रकारे वजन कमी करण्यासोबतच क्विनोआचे आरोग्यासाठी इतर अनेक फायदे असल्याने तुम्ही आहारात क्विनोआचा समावेश करू शकता. क्विनोआ उपमा, खिचडी, पुलाव किंवा सलाडमध्ये खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायपालिका सर्वोच्च नाही, राष्ट्रपती अन् राज्यपालांच्या अधिकारांवर केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला स्पष्टच सांगितलं

Pune Rains : पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार

Shubhanshu Shukla : शुभांशू शुक्ला मायदेशी परतले; दिल्ली विमानतळावर ढोल-ताशांच्या गजरात जोरदार स्वागत, पंतप्रधान मोदींची घेणार भेट

Sunday Special Healthy Breakfast: रविवारी बनवा स्पेशल गुजराती नाश्ता; लिहून घ्या चवील मस्त अशा पालक पुडलाची रेसिपी

आजचे राशिभविष्य - 17 ऑगस्ट 2025

SCROLL FOR NEXT