conjunctiva sakal
आरोग्य

आरोग्यशास्त्र : डोळे येणे म्हणजे नेमके काय?

सामान्यपणे आपल्या डोळ्यातील पांढऱ्या भागावर आणि पापण्यांच्या आतील भागावर पारदर्शक असा थर असतो, ज्याला ‘कंजंक्टिव्हा’ असे म्हणतात.

सकाळ वृत्तसेवा

सामान्यपणे आपल्या डोळ्यातील पांढऱ्या भागावर आणि पापण्यांच्या आतील भागावर पारदर्शक असा थर असतो, ज्याला ‘कंजंक्टिव्हा’ असे म्हणतात.

- डॉ. अंबरीष दरक

सामान्यपणे आपल्या डोळ्यातील पांढऱ्या भागावर आणि पापण्यांच्या आतील भागावर पारदर्शक असा थर असतो, ज्याला ‘कंजंक्टिव्हा’ असे म्हणतात. कंजंक्टिव्हायटिस अथवा डोळे येणे म्हणजे याच कंजंक्टिव्हाला सूज येणे.

डोळे येण्यामागची कारणे

  • जिवाणू अथवा विषाणूंच्या संसर्गामुळे होणारा कंजंक्टिव्हायटिस ः याचे संक्रमण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस होते. डोळे आलेल्या व्यक्तीचा रुमाल, चष्मा, आयड्रॉप्स किंवा सौंदर्यप्रसाधने यांच्या वापरामुळे इतरांकडे त्याचा प्रसार होतो. स्टॅफिलोकॉकस, स्ट्रेप्टोकॉकस, हिमोफिलस असे जिवाणू आणि ॲडेनोव्हायरस, ॲटेरोवायरस, हरपीस असे विषाणू कारणीभूत असू शकतात.

  • ॲलर्जीमुळे होणारा कंजंक्टिव्हायटिस ः वातावरणातील बदल, हवेतील परागकण, धूळ, धूर, प्रदूषण, प्राण्यांचे केस आणि दीर्घकाळासाठी कॉन्टॅक्ट लेन्सेसचा वापर यामुळे ॲलर्जी होऊन डोळे येतात.

  • दूषित पाणी अथवा रासायनिक द्रव्ये यांचा डोळ्यांशी संपर्क

  • हानिकारक प्रकाश किंवा किरणे

  • डोळ्यांना सतत आणि दीर्घकाळासाठी कोरडेपणा असणे

  • काही ऑटोइम्म्युन आजारामध्येही कंजंक्टिव्हायटिस होतो

  • प्रसूतीच्या वेळेस निष्काळजीपणा व अस्वच्छ पद्धती यामुळे नवजात अर्भकांमध्ये कंजंक्टिव्हायटिस आढळून येतो.

  • शरीराची अस्वच्छता व एकंदर अस्वच्छ जीवनमान यामुळे देखील डोळे येतात आणि त्याची साथ पसरण्यास वाव मिळतो.

कोणती लक्षणे आढळतात -

  • डोळे लाल होणे आणि सूज येणे

  • डोळ्यांतून पाणी येणे

  • डोळ्यांची जळजळ होणे

  • डोळ्यात सतत काहीतरी गेल्यासारखे वाटून डोळ्यांचे खुपणे आणि डोळे चोळावेसे वाटणे

  • तीव्र प्रकाश सहन न होणे (संवेदनशीलता)

  • डोके दुखणे

  • काही प्रसंगी दृष्टी काही अंशी अस्पष्ट होणे

  • संसर्गामुळे डोळे आले असल्यास डोळ्यातून घाण (डिसचार्ज) येणे आणि त्यामुळे पापण्यांचे चिकटणे

  • ॲलर्जीमुळे डोळे आले असल्यास पापण्यांना सूज येणे आणि खाज येणे

निदान आणि उपचार

वरीलप्रमाणे लक्षणे आढळून आल्यास वेळीच नेत्रचिकित्सकांकडून डोळ्याची तपासणी करून घ्यावी. लक्षणे पाहून आणि क्लिनिकल मूल्यांकन करून डॉक्टर उपचार सांगतात.

जिवाणूंच्या संसर्गासाठी अँटिबायोटिक आयड्रॉप्स तर विषाणूंच्या संसर्गासाठी लुब्रिकेटिंग आयड्रॉप्स आणि सूज कमी करणारे आयड्रॉप्स डॉक्टर देतात. ॲलर्जीमुळे डोळे आले असल्यास अँटिहिस्टॅमिनीक आणि गरजेनुसार स्टिरॉइड आयड्रॉप्स दिले जातात. सूचना दिल्याप्रमाणे उपचार आणि काळजी घेतल्यास सामान्यपणे ७-१० दिवसात सुधारणा दिसून येते. परंतु, दीर्घकाळ लक्षणे राहिल्यास डॉक्टर डोळ्यातील डिस्चार्ज स्वॉब घेऊन त्याची तपासणी करतात आणि त्यानुसार विशिष्ट अँटिबायोटिक व अँटीइंफ्लमेटरी गोळ्या घेण्याचा सल्ला देतात.

काय काळजी घ्यावी

  • डोळ्यांची स्वच्छता राखावी.

  • डोळ्यांना हात लावल्यानंतर अथवा आयड्रॉप्स डोळ्यात सोडल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत.

  • डोळे आलेल्या व्यक्तीने घराबाहेर पडताना अथवा लोकांच्या संपर्कात येताना काळा चष्मा वापरावा.

  • आपला रुमाल, चष्मा, आयड्रॉप्स अथवा इतर वस्तू इतरांना वापरण्यास देऊ नयेत.

  • डॉक्टरांच्या सल्यानुसार वेळीच उपचार घ्यावेत.

(लेखक नेत्रविकारतज्ज्ञ व नेत्रशल्यचिकित्सक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai : गमावलेलं प्रेम काही तासात मिळवा, ब्रेकअपनंतर १८ वर्षीय तरुणी जाहिरातीला भुलली; टोळीने १३ तोळे दागिने अन् ३ लाख लुबाडले

Audi A9 Chameleon Car : 100,00,00,000 रुपयांची कार! नीता अंबानीने खरेदी केली रंग बदलणारी ऑडी; जबरदस्त फीचर्स पाहा एका क्लिकवर

Ahilyanagar News: पारनेर दूध संघावर ‘जनसेवा’चा झेंडा; डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली १२ जागांवर विजय

Pune Municipal Corporation : मिळकतकराच्या निकषाचा फटका, ‘शहरी गरीब आरोग्य’ योजना; ५१३ लाभार्थ्यांची मदत अडवली

Pune Smart City : बालेवाडीत स्मार्ट स्वच्छतागृहाचे काम सुरू, पुण्यात पाच ठिकाणी बांधणार; चार कोटी ३१ लाखांचा खर्च

SCROLL FOR NEXT