
Crime News: मुंबईत एका तरुणीला इन्स्टाग्रामवरून जाळ्यात अडकवत १३ तोळे सोन्याचे दागिने लुबाडल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. ब्रेकअप झाल्यानं तरुणी नैराश्यात होती. यातच तिला इन्स्टाग्रामवर लॉस्ट लव्ह बॅक, खोया हुआ प्यार पाये २४ घंटे मे अशा जाहिराती दिसल्या. या जाहिरातींना बळी पडून तरुणीची मोठी फसवणूक झाली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.