फळांच्या सेवनातून पचनाच्या समस्या होतील दूर
फळांच्या सेवनातून पचनाच्या समस्या होतील दूर Esakal
आरोग्य

Digestionचा सतत त्रास होतो? ‘या’ फळांच्या सेवनाने पचनाच्या समस्या होतील दूर

Kirti Wadkar

बदललेली जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे म्हणजे तेलकट, तिखट पदार्थ तसंच जंक फूड आणि जेवणाच्या चुकीच्या वेळांमुळे अनेकांना पचनासंबंधीच्या विविध समस्या Digestion Problems उद्भवत असतात. Health Tips in Marathi eat fruits to solve problem of indigestion

तसंच तर गॅस, बद्धकोष्ठता आणि पोटदुखी अशा पचनाच्या समस्या सामान्य असल्या तरी अनेकदा याचा तुमच्या दिवसभरातील दिनचर्य़ेवर परिणाम होतो. जर सतत अपचनाचा Indigestion त्रास होत असेल तर शरीरामध्ये इतरही काही समस्या निर्माण होवू शकतात.

योग्य पचन व्हावं आणि पचनाच्या या समस्या दूर व्हाव्यात यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये बदल करू शकता. पोटाचं आरोग्य Stomach Health चांगलं राहिल्यास आणि अन्नाचं योग्य पचन झाल्यास तुम्हाला विविध आजारांपासून दूर राहता येतं.

पचन चांगलं व्हावं यासाठी आहारामध्ये जास्तीत जास्त फायबरयुक्त पदार्थांचा Fiber समावेश करण्याचा सल्ला तज्ञ देतात. फायबरमुळे अन्नाचं पचन होण्यास मदत होते. तसंच इतरही अनेक समस्या दूर होतात. आहारामध्ये फळांचा समावेश करणं हा यासाठी एक चांगला पर्याय आहे.

अशी काही फळं आहे. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर उपलब्ध असून ज्यामुळे पचनासाठी गरजेचा असलेला पाचक रस तयार होण्यास मदत होते आणि अपचनाची समस्या दूर होते.

केळं

पचनासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये नियमितपणे केळ्याचा समावेश करू शकता. भारतासारख्या देशात बाराही महिने अगदी सहज आणि कमी किमतीत उपलब्ध होणारं केळ तुमच्या पचनाच्या समस्या दूर करण्यास उपयुक्त ठरेल.

बद्धकोष्ठता आणि अपचनाची समस्या दूर करण्यासाठी हा एक उत्तम घरगुती उपाय म्हणता येईल. केळ्याच्या सेवनामुळे आतड्यांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. तसंच यामुळे पचनक्रिया जलद होते. तसंच केळ्याच्या सेवनामुळे पोटामध्ये होणाऱ्या अल्सरचा धोका कमी होतो.

हे देखिल वाचा-

सफरचंद

सफरचंदाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. निरोगी राहण्यासाठी दैनंदिन आहारात सफरचंद सामील करण्याचा सल्ला तज्ञ देतात. सफरचंदांमध्ये पेक्टिन फायबरचं प्रमाण जास्त असल्याने बद्धकोष्ठता आणि अतिसार या दोन्ही समस्या दूर होतात. पेक्टिनमुळे शरीर डिटॉक्स होण्यास तसंच कोलेस्ट्रॉलची समस्या दूर होण्यासही मदत होते.

पपई

पपईमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्व आढळत असल्याने पपई खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. पपईमध्ये मुबलक प्रमाणात फायबर, सोडियम, पोटॅशिय, प्रोटीन, व्हटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी आढळतं. पपईच्या सेवनामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. तसंच अॅसिडीटीची समस्या दूर करून पचन चांगलं होण्यास मदत होते.

पेरू

पेरू हे फळ अत्यंत आरोग्यदायी आहे. पेरूमध्ये सोडियम, पोटॅशियम, आयर्न, व्हिटॅमिन सी आणि मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने पचन क्रिया सुरळीत होण्यास मदत होते. पेरूच्या सेवनामुळे बद्धकोष्ठता दूर होऊन पचनाच्या विकारांचा धोका कमी होते. तसंच पेरूमध्ये अत्यंत कमी कॅलरी असल्याने वजन कमी करण्यासाठी पेरूचं सेवन उपयुक्त ठरतं.

याशिवाय उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फळांचा राजा असलेल्या आंब्याचं सेवन पचनासाठी फायदेशीर ठरतं. तेव्हा या मोसमी फळाचा देखील आहारामध्ये समावेश करण्यास विसरू नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT