Monday Motivation
Monday Motivation esakal
आरोग्य

Monday Motivation : कोणत्याही कामात सातत्य अन् चिकाटी राहत नाही? जाणून घ्या कारण अन् उपाय

धनश्री भावसार-बगाडे

How To Keep Consistency For Success : कोणत्याही कामात यशस्वी व्हायचं असेल तर सातत्य आणि चिकाटी हे गुण असणं फार आवश्यक आहे. पण हल्लीच्या जगात तेच टिकून राहणं फार अवघड झाल्याचं दिसून येत आहे. स्पर्धा आणि प्रलोभनं ही महत्वाची कारण असली तरी अजून अनेक कारण आहेत त्यामुळे आपलं सातत्य राहत नाही. ती कारण कोणती आणि त्यातून बाहेर पडण्याचे उपाय कोणते जाणून घेऊया.

सातत्य न टिकाण्यामागचं मानसशास्त्र

आपल्या मेंदूला रिवॉर्ड प्रणालीची सवय झालेली असते. ज्या गोष्टीचा तात्काळ परिणाम मिळतो ती करायला मजा येते कारण तात्कार परिणामाने समाधान मिळते. पण लाँग टर्म परिणामांचा जेव्हा विचार येतो तेव्हा ही प्रणाली हस्तक्षेप करते. मेंदू आपल्याला त्या गोष्टीपासून दूर करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे सातत्या भंग पावतं.

तर दुसरं मानसशास्त्र म्हणजे जेव्हा आपल्या तत्व, श्रध्दा किंवा मुल्यांकनाच्या तोडीस ती गोष्ट नाही असं आढळलं की मग आपले सिद्धांत त्या विसंगत गोष्टीपासून आपल्याला विचलीत करू पाहतात.

सामान्य कारणे

ध्येय स्पष्ट नसणे - आपलं ध्येय, लक्ष्य हे आपल्या आयुष्यात होकायंत्राचं काम करतात. ते आपल्याला योग्य दिशा दाखवत असतात. त्यामुळे जर तुम्हाला नक्की काय मिळवायचं आहे हे स्पष्ट असेल तर तुम्ही त्या मार्गाने प्रवास करू शकतात. पण नसेल तर मात्र सातत्या टिकवण कठीण असते.

परफेक्शनची भीती

बऱ्याचदा आपल्याकडून चूक झाली तर, हे आपल्याला परफेक्ट जमेल का? या भीतीने बरेच लोक काम करण्याचं टाळतात. त्यामुळे चुकांना घाबरण्यापेक्षा किंवा परफेक्शनच्या दबावाखाली वावरण्यापेक्षा प्रयत्न करत राहणं जास्त आवश्यक असतं. सातत्य म्हणजे परफेक्शन नसून सतत प्रयत्न करत प्रगती करत राहणं असतं.

प्रेरणा किंवा स्वारस्य (इंटरेस्ट) नसणे

जी गोष्ट तुम्ही करत आहात त्या विषयी तुम्हाला आंतरीक प्रेरणा किंवा स्वारस्य नसेल तर सातत्य टिकून रहायला अडथळा निर्माण होतो. पॅशन जपणे आणि वैयक्तीक मुल्यांशी जुळणाऱ्या प्रेरणा ओळखल्या की, सातत्य टिकवून ठेवणे शक्य होते.

सवयी विकसित करा

जी गोष्ट आपल्याला मिळवायची आहे त्यासाठीच्या प्रयत्नांची सवय लावून घ्या. सवय लागण्यासाठी त्यात आवड वाढेल अशा पद्धतींना अवलंब करा. त्या अभावानेच सातत्य भंग पावते.

चालढकल

काही लोकांना उद्या करतो, बघू नंतर असं म्हणून गोष्टी पुढे ढकलण्याची सवय असते. यामागे भीती, दबाव किंवा परफेक्शन असे कोणतेही कारण असू शकते. ते दूर करणे गरजेचे आहे.

उपाय

ध्येय ठरवा, नियोजन करा

ध्येय स्मार्ट (SMART) असावे. म्हणजे स्पेसिफीक (विशिष्ट), मेझरेबल (मोजता येण्याजोगं), अचिव्हेबल (साध्य करता येण्यासारखं), रिलेव्हंट (सुसंगत), टाइम बाउंड (ठराविक कालावधीचे) असं असलं म्हणजे उमेद मिळते. ते साध्य करण्यासाठी दिवसाचं नियोजन करा. वेळापत्रक ठरवा म्हणजे शक्य होईल.

आत्मपरिक्षण

आत्मपरिक्षण करा आणि स्वतःकडे सजगतेने बघा. म्हणजे तुम्ही तुमच्यातली सातत्य घालवणारी गोष्ट कोणती ती ओळखून दूर करू शकतात.

जबाबदारी आणि सामाजिक सहकार्य

एखाद्या गोष्टीसाठी एकत्रीत प्रयत्न केले तर त्यात सातत्य टिकून राहण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तुमच्या प्रयत्नांसाठी कोणी सोबती मिळत असेल तर त्यात सातत्य टिकवणं शक्य होते. उदा, रोज व्यायम करणे यासाठी योगा क्लास, क्लब किंवा जीम ला जाणे मदतशीर ठरू शकते.

लहान बक्षिसे, कौतुकाचे प्रोत्साहन

छोटे छोटे विजय साजरे केल्याने प्रोत्साहन मिळते. त्यामुळे सातत्य टिकण्यास मदत होते.

अडथळ्यांवर मात

सातत्य टिकवण्यात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करणे आवश्यक असते. आपल्यात लवचिकता विकसित करून सातत्य टिकवता येणे गरजेचे असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT