Morning Skin Care esakal
आरोग्य

Morning Skin Care: सकाळी उठल्यावर 'या' पाच गोष्टी करा; चाळीशीतही दिसाल अभिनेत्रींसारखं तरूण

तरूण त्वचेसाठी हे उपाय करा

सकाळ डिजिटल टीम

Skin Care News: रोजच्या धावपळीच्या जीवनात प्रदूषण, धूळ या सगळ्याचा तुमच्या स्किनवर प्रभाव पडतो. तुमच्या चेहऱ्याची वेळेत उत्तम काळजी घेणे महत्वाचे ठरते. तुमच्या स्किनसंदर्भात तुम्ही सकाळी उठताबरोबर या काही गोष्टी नियमित केल्यास तुम्ही वयाच्या चाळीशीनंतरही तरूण दिसू शकता.

मॉर्निंग स्किन केअर रूटीन असे असावे

सकाळी उठल्यानंतर गार पाण्याने चेहरा धुवा. याने वयानुसार वाढणारे पोअर्स बंद होतात. थंड पाणी त्वचेवरील सुरकुत्यांना प्रतिबंध घालते. ज्यामुळे तुम्ही दीर्घकाळ तरूण दिसता. थंड पाण्याने रात्रभर तुमच्या चेहऱ्यावर अतिरिक्त साचलेले तेल रिमूव्ह होण्यास मदत होते. त्यामुळे चेहऱ्यावरील मुरुमांची समस्याही कमी होते. (Skin Care)

उत्तम स्किन केअरसाठी या काही टीप्स फॉलो करा

पाण्याने चेहरा धुवा त्यानंतर टोनरचा वापर करा. गुलाबपाणी कधीही उत्तम ठरेल. गुलाब पाणी लावल्यानंतर तुमच्या स्किननुसार मॉश्चरायझर लावा.

भरपूर पाणी प्या

सकाळी उठल्यानंतर किमान एक ते दोन ग्लास पाणी प्या. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. हवे असल्यास पाण्यासोबत नारळ पाणी किंवा ग्रीन टी प्या. त्याने सकाळी त्वचेला ताजेतवाने आणि हायड्रेट करण्यास मदत होईल.

क्लिन्झर म्हणून गुलाबपाणी आणि लिंबापासून बनवलेले सिरम चेहऱ्यावर लावा

त्यात थोडेसे ग्लिसरीन टाका त्याने त्वचा चांगली स्वच्छ होते.

हे क्लिंझर चेहरा आणि मानेवर लावणं आवश्यक आहे. यामुळे चेहऱ्यावरील घाण साफ होईल.

ग्लिसरीन त्वचेला ओलावा देईल. त्यामुळे त्वचा कोरडी दिसणार नाही आणि त्वचेला दीर्घकाळ तरूण राहण्याची संधी मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIFA World Cup 2026: सर्वोत्तम खेळाडूचा 'गोल्डन बूट' कोणाला? मेस्सी, रोनाल्डोसह हे खेळाडू प्रमुख दावेदार

Cancer Drug Price Hike: कॅन्सर उपचार होणार महाग! जीवनावश्यक औषधांच्या किमती 50% पर्यंत वाढण्याची शक्यता; केंद्र सरकारची मंजुरी

घाटकोपरमध्ये पांढऱ्या पट्टीच्या वादावर पडदा, रंगाच्या पट्ट्या मारत काढला तोडगा

Vidarbha Schools: विदर्भात 30 जूनला वाजणार शाळांची घंटा; न्यायालयाचे आदेश, शासनाचे सुधारित पत्र निघणार

Latest Marathi News Live Update : वाशिममध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात; चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याखाली

SCROLL FOR NEXT