Ramadan 2024
Ramadan 2024 esakal
आरोग्य

Ramadan 2024 : रमझान दरम्यान मधुमेहाची अशी घ्या काळजी, फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

Monika Lonkar –Kumbhar

Ramadan 2024 : मुस्लिम समुदायासाठी रमझान ईदचे पर्व हे अतिशय खास मानले जाते. जगभरातील लाखो लोक महिनाभर नमाज आणि रोजाचे पालन करतात. परंतु, हे उपवास कडक असतात. रमझानदरम्यान, पहाटेपासून ते सूर्यास्तापर्यंत उपवास केले जातात.

परंतु, ज्या लोकांना मधुमेहाची समस्या आहे, अशा लोकांनी या दिवसांमध्ये आरोग्याची खास काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांच्यासाठी हा पवित्र सण आव्हानात्मक ठरू शकतो. धार्मिक प्रथांचे पालन करण्यासोबतच या दिवसांमध्ये आरोग्याची देखील काळजी घेणे महत्वाचे आहे.

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी रमझानच्या काळात संतुलित पौष्टिक आहाराचे नियोजन करण्यासोबतच नियमितपणे तपासणी करणे देखील महत्वाचे आहे.

यासंदर्भात बोलताना मुंबईतील हिंदुजा व लीलावती हॉस्पिटलचे कन्‍सल्‍टण्‍ट फिजिशयन डॉ. अनिल बलानी म्‍हणाले की, ''नुकतेच करण्‍यात आलेल्‍या आयसीएमआर संशोधनानुसार, भारतातील १०१ दशलक्ष व्‍यक्‍तींना मधुमेह आहे, ज्‍यामधून प्रभावी सर्वांगीण व्‍यवस्‍थापनाचे महत्त्व दिसून येते.

रमझानच्‍या पवित्र उपवासादरम्‍यान कन्टिन्‍युअल ग्‍लुकोज मॉनिटरिंग (सीजीएम) मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍तींसाठी वरदान आहे. रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांवर रिअल-टाइम देखरेख ठेवत सीजीएम व्‍यक्‍तींना उपवासापूर्वी आणि उपवासानंतरच्‍या आहारामुळे रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांमध्‍ये होणाऱ्या कोणत्‍याही चढ-उतारांना ओळखण्‍यास आणि त्‍यांचे व्‍यवस्‍थान करण्‍यास साह्य करते.

सीजीएमद्वारे मिळालेल्‍या माहितीच्‍या आधारे व्‍यक्‍ती आहाराबाबत योग्‍य निर्णय घेऊ शकतात. यामुळे त्‍यांना आहाराचे प्रमाण व वेळ निर्धारित करण्‍यास, तसेच त्‍यांच्‍या गरजांची पूर्तता करू शकतील अशा मधुमेह संबंधित पोषण निवडी करण्‍यास मदत होऊ शकते. सीजीएम डेटा व आहारसंबंधित निर्णय यांच्‍यामधील संबंधामुळे रक्‍तातील शर्करेच्‍या पातळ्यांचे प्रभावी व्‍यवस्‍थापन व सक्षमीकरणाला चालना मिळते.''  

आज आम्ही तुम्हाला रमझान दरम्यान मधुमेह असलेल्या व्यक्तींनी आरोग्याची खास काळजी कशी घ्यावी? याबद्दल काही महत्वाच्या आणि सोप्या टिप्स देणार आहोत. कोणत्या आहेत त्या सोप्या टिप्स चला तर मग जाणून घेऊयात.

रक्तातील साखरेची तपासणी अवश्य करा

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी या काळात नियमितपणे रक्तातील साखरेच्या पातळीची जरूर तपासणी करावी. हे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही कन्टिन्‍युअल ग्‍लुकोज मॉनिटरिंग (सीजीएम) डिव्हाईसचा वापर करू शकता.

हे डिव्हाईस विशिष्ट वेळी रक्तातील साखरेच्या पातळीला कॅप्चर करण्याऐवजी रिअल-टाईम ग्लुकोज मॉनिटरिंगमध्ये साह्य करते. विशेष म्हणजे हा डेटा सहजपणे स्मार्टफोनवर दिसतो. ज्यामुळे, तुम्हाला आहार, शारिरीक व्यायाम आणि थेरपीसंदर्भात निर्णय घेणे सोपे जाऊ शकते. (check your blood sugar)

शरीराला उत्तम पोषणाची गरज

रमझानचा उपवास सोडताना प्रथेनुसार खजूर आणि फळांचे सेवन करून हा उपवास सोडला जातो. त्यानंतर, योग्य संतुलित आहार घेतला जातो. या काळात भरपूर पाणी प्या आणि शरीर हायड्रेटेड ठेवा. तुमच्या आहारात कर्बोदके, प्रथिने, आणि फायबर्सनेयुक्त असलेल्या खाद्यपदार्थांचा अवश्य समावेश करा. यामुळे, तुमच्या शरीराला योग्य पोषण मिळू शकेल.

या दिवसांमध्ये उच्च कॅफिन असलेले किंवा कॉफी, चहा आणि शीतपेये यांचे सेवन करणे टाळा. जास्तीत जास्त पौष्टिक आणि संतुलित आहार घेण्यावर भर द्या. तसेच, तुमच्या शरीराच्या पौष्टिक गरजांनुसार योग्य आहाराची निवड करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. (Good Nutrition important)

झोपेचे व्यवस्थापन अवश्य करा

निरोगी आरोग्यासाठी झोप अतिशय महत्वाची आहे. रमझान दरम्यान अनेकदा नातेवाईक, कुटुंबियांसोबत रात्री उशिरापर्यंत गप्पा मारल्या जातात, वेळ व्यतित केला जातो. परिणामी या जागरणाचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे, या काळात पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे.

झोप कमी झाल्यास याचा भूकेवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, चयापचयाची क्रिया मंदावणे, रक्तातील साखरेची पातळी कमी जास्त होणे इत्यादी समस्या भेडसावू शकतात. त्यामुळे, रमझान दरम्यान जागरण टाळा आणि पुरेशी झोप घ्या. (Do manage sleep)

शारिरीक व्यायाम आहे महत्वाचा

मधुमेहाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी व्यायाम करणे हा उत्तम मार्ग आहे. तुमच्या शरीराला झेपेल असा व्यायाम, योगा करा. यामुळे, तुमचे शरीर तंदुरूस्त राहण्यास मदत होईल. परंतु, अतिप्रमाणात व्यायाम करणे टाळा. व्यायामासोबतच तुम्ही चालण्याचा ही व्यायाम करू शकता.

या सोप्या आणि महत्वपूर्ण टिप्स तुम्हाला मधुमेहाची काळजी घेण्यास नक्कीच मदत करतील, यात काही शंका नाही. यामुळे, रमझानच्या काळातही तुमचे आरोग्य निरोगी राहील. (Physical exercise is important)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT