Remedy for yellow teeth
Remedy for yellow teeth Esakal
आरोग्य

पिवळ्या दातावरच्या रोगाला औषध काय... हाय याचा घरीच उपाय हाय

अशोक निंबाळकर

अहमदनगर : कोणत्याही माणसाचं सौंदर्य दातावरच अवलंबून असतं. हल्ली दातासाठी लाखो रूपये खर्च करणारे लोक आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे दाताचे आरोग्य बिघडले आहे. दात, दाढ किडणे ही समस्या कॉमन आहे.

दातांचे आरोग्य राखले तर तुमचे जीवन सुखी होऊ शकते. कारण दात चांगले असतील तरच तुम्ही खाल्लेलं चांगलं पचतं. नाही तर केसगळतीसारख्या समस्या उदभवतात. बऱ्याचदा आपण पाहतो, काही लोकांच्या तोंडाची दुर्गंधी येते. त्याला सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, अशी सार्वजनिक समस्या आहे.

'दात पांढरे करणे' या पद्धतीचा अवलंब लोकांकडून केला जातो. तथापि, बरेच लोक या पद्धतीवर विश्वास ठेवत नाहीत, कारण त्यांचा असा विश्वास आहे की यामुळे दात आरोग्यासही नुकसान होते. याशिवाय, असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे दात पांढरे आणि चमकदार केले जाऊ शकतात.

दात का पिवळसर होतात?

- धूम्रपान आणि मद्यपानामुळे समस्या उदभवतात.

- जास्त प्रमाणात कॉफी आणि कार्बयुक्त पदार्थामुळे

- दात सतत वापरल्यामुळे मुलामा पातळ होतो.

- वयानुसार दात पिवळसर होणे

- एखाद्या औषधाच्या प्रतिक्रियामुळे किंवा वेगवेगळे ड्रींक्समुळे.

काही उपाय

१. अॅपल व्हिनेगर : पबमेड सेंट्रलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, सफरचंद व्हिनेगर दात पांढरे करण्यात फायदेशीर ठरू शकते, परंतु ते कमीत कमी प्रमाणात वापरावे आणि ते नियमित केले जाऊ नये कारण यामुळे दाताचा पृष्ठभाग खराब होतो.

२. घासणे: दात घासण्यासाठी रोज दोनदा आणि कमीत कमी 2-3 मिनिटांसाठी ब्रश करणे आवश्यक आहे. तोंडाचा प्रत्येक भाग जिभेसह स्वच्छ करावा. आपण दात पांढरे करणारे पेस्टदेखील वापरू शकता.

बाजारात दाताच्या पेस्टचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. यामुळे आपल्या दातावरील डाग दूर होतील. काहीजण कॅप्सूलचाही वापर करतात.

हायड्रोजन पेरोक्साईड आणि बेकिंग सोडा: हायड्रोजन पेरोक्साईड आणि बेकिंग सोडा यांचे मिश्रण मिसळवून दात घासल्यास पिवळसर आणि डाग दूर होऊ शकतात. आपण या दोन्ही गोष्टी असलेल्या टूथपेस्टचा वापर करू शकता किंवा घरी दोन चमचे हायड्रोजन पेरोक्साईडमध्ये एक चमचा सोडा मिसळून ते दातांवर लावू शकता.

(डिस्क्लेमर: लेखात नमूद केलेला सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहेत. आपल्याला काही प्रश्न किंवा समस्या असल्यास नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. परिणामांसाठी सकाळ माध्यम समूह कोणतीही जबाबदारी घेत नाही.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT