Post Covid Death
Post Covid Death esakal
आरोग्य

Post Covid Death : धक्कादायक! कोविड उपचारानंतर घरी गेलेल्या रुग्णांपैकी 6.5% रूग्ण वर्षभरातच दगावली

साक्षी राऊत

Post Covid Death : कोरोना काळातील दयनीय अवस्था आठवून आजही अंगाला शहारा येतो. मात्र याच कोविडबाबत अभ्यासातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. अभ्यासात इतर लोकांच्या तुलनेत कोविडनंतर रूग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या रूग्णांच्या मृत्यूची शक्यता तीन पटीने जास्त होती. ही माहिती भारतीय परिषदेच्या अंतर्गत रूग्णालयांच्या नेटवर्कमधून नुकत्याच प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार पुढे आली आहे.

अभ्यासातून पुढे आली धक्कादायक माहिती

मध्यम ते गंभीर कोविड -19 संसर्गासह रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी 6.5% टक्के लोक एक वर्षाच्या फॉलो-अपनंतर शेवटी मरण पावले.

हे निरीक्षण 31 रुग्णालयांमधील 14,419 रुग्णांच्या डेटावर आधारित आहे ज्यांचा एका वर्षासाठी फोनवर फॉलोअप घेण्यात आला होता.

अभ्यासात असे दिसून आले आहे की सप्टेंबर 2020 पासून रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी 17.1% लोकांना कोविड नंतरसुद्धा बरीच लक्षणे दिसून आली. रूग्णालयांचा हा अभ्यास WHO किंवा US CDC "लाँग-कोविड" व्याख्येचे पालन करत नव्हता, कारण WHO ची व्याख्या येण्यापूर्वीच रूग्णालयांनी या संशोधनाला सुरुवात केली होती. थकवा, श्वास लागणे किंवा लक्षात ठेवण्यात अडचणी यासारख्या संज्ञानात्मक विकृतींची सतत किंवा नवीन सुरुवात अशी "लाँग कोविडची" नवी व्याख्या या रूग्णालयांनी केली आहे. याशिवाय एकाग्रता आणि ब्रेन फॉग यांचाही समावेश लाँग कोविडच्या लक्षणांत करण्यात आला होता. डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुढील चार आठवड्यात पहिल्या फॉलो-अप दरम्यान ही लक्षणे आढळल्यासच सहभागींना पोस्ट-कोविड स्थिती असल्याचे सांगण्यात आले. (Health)

अभ्यासातून पुढे आलेली चकीत करणारी बाब म्हणजे कोविडनंतर डिस्चार्ज मिळालेल्या रूग्णांमध्ये एका वर्षात दगावणाऱ्यांमध्ये पुरुषांची संख्या जास्त होती. शिवाय यात ६० वर्षांवरील वयोवृद्ध आणि क्रिटिकल कंडिशन असलेल्या रूग्णांचा समावेश होता.

मात्र कोविडच्या संपूर्ण काळात कोविड व्हॅक्सिनने महत्वाचा भूमिका बजावली. अभ्यासात असे आढळून आले की, ज्यांना लसीचा किमान एक डोस मिळाला आहे त्यांना चार आठवड्यांच्या पहिल्या फॉलोअप दरम्यान मृत्यूचा धोका 40% कमी होता.

“हा संपूर्ण अभ्यासामध्ये मध्यम ते गंभीर कोविड-19 रूग्ण रूग्णालयात दाखल होऊन डिस्चार्ज मिळाल्यानंतर झालेल्या मृत्यूशी संबंधित आहे,” असे माजी ICMR शी संबंधित वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT