Ayurveda for Fever esakal
आरोग्य

Ayurveda for Fever : ताप कमी करण्यासाठी आयुर्वेदाची घ्या मदत, 'हे' आहेत प्रभावी उपाय

Ayurveda for Fever : उष्माघातामुळे ताप येणे, चक्कर येणे आणि थकवा येण्यासारख्या समस्या निर्माण होतात.

Monika Lonkar –Kumbhar

Ayurveda for Fever : वातावरण बदलले की, आरोग्याच्या समस्या सुरू होतात. सध्या सगळीकडे प्रचंड उकाडा आहे. एप्रिल महिन्यातच उन्हाच्या तीव्र झळा सुरू झाल्या आहेत. या झळांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. खास करून लहान मुले आणि वयोवृद्धांना याचा अधिक त्रास होतो. उष्माघातामुळे ताप येणे, चक्कर येणे आणि थकवा येण्यासारख्या समस्या निर्माण होतात.  

खरं तर ताप येणे ही एक सामान्य समस्या आहे. ताप आला की, व्यक्तीच्या शरीराचे तापमान वाढते आणि व्यक्तीला खूप अशक्तपणा जाणवतो. जेव्हा आपल्या शरीराला एखादा संसर्ग होतो तेव्हा त्या संसर्गाचा सामना करताना ताप येतो. ही समस्या फार मोठी नाही.

परंतु, बराच काळ जर ताप राहिला, तर ही समस्या गंभीर असू शकते. त्यामुळे, या तापाकडे दुर्लक्ष करू नका. काही घरगुती आणि सोप्या उपायांच्या मदतीने तुम्ही सौम्य ताप बरा करू शकता. कोणते आहेत हे आयुर्वेदिक आणि सोपे उपाय? चला तर मग जाणून घेऊयात.

तोंडात तुळशीची पाने चघळा

तुळस ही वनस्पती प्रत्येकाच्या घरी असते. या तुळशीमुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. तुळस ही औषधी वनस्पती असल्यामुळे, अनेक गुणधर्म तुळशीमध्ये आढळून येतात. अनेक आजारांना दूर करण्यासाठी तुळशीचा वापर प्रामुख्याने केला जातो. काही आयुर्वेदिक औषधांमध्ये तुळशीचा वापर केला जातो.

ताप कमी करण्यासाठी तुम्ही तुळशीची मदत घेऊ शकता. यासाठी तुम्ही तुळशीच्या पानांपासून काढा बनवून पिऊ शकता किंवा तोंडात तुळशीची पाने चघळू शकता. मधामध्ये तुळशीची पाने मिसळून खाल्ल्याने देखील तुम्हाला फायदा मिळू शकतो. तापासोबतच, सर्दी, खोकल्यासारख्या समस्येवर तुळशीच्या पानांपासून बनवलेला काढा हा प्रभावी उपाय आहे. (Chew Basil Leaves in your mouth)

आलं आणि पुदिन्याचा काढा

सकाळच्या चहामध्ये आलं नसेल, तर तो चहा फिका वाटतो. चहाची चव आणि खाद्यपदार्थांची चव वाढवण्यासोबतच आलं हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये आल्याचा प्रामुख्याने वापर केला जातो.

आल्यासोबतच पुदिना देखील आपल्या आरोग्यासाठी लाभदायी आहे. पुदिन्याचा वापर अनेक खाद्यपदार्थांमध्ये केला जातो. परंतु, तापाची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही पुदिना आणि आल्याची मदत घेऊ शकता. त्यासाठी आलं आणि पुदिन्याचा काढा बनवा. एका भांड्यात १ ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये आल्याचे बारीक तुकडे आणि पुदिन्याची पाने घालून हे पाणी चांगले उकळून घ्या. दिवसातून २ वेळा हे पाणी प्या. तुम्हाला तापापासून आराम मिळण्यास मदत होईल. (Ginger and Mint Kadha)

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: सर्पमित्र कोब्रा पकडत होता, तेवढ्याच सापाने केला दंश... जाग्यावरच कोसळला, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

तब्बल १२ वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार प्रिया बापट आणि उमेश कामत; चित्रपटाचं नाव वाचलंत का?

घरातच निघाला चोर! आलियाला तिच्याच मॅनेजरने फसवलं, तब्बल 77 लाख लुबाडले, अखेर अटक

Latest Maharashtra News Live Updates: गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा फटका; शेतकरी व नागरिकांचे हाल

Wimbledon 2025: भारत-पाक सामन्याएवढाच टेनिसपटूंवरही तणाव : विराट कोहली

SCROLL FOR NEXT