Health Care sakal
आरोग्य

Health Care : तुमचे मूल तोतरे बोलते का?

तर गमावू शकते आत्मविश्वास, वाणीदोषावर घ्या वेळीच उपचार... तुमचे मूल मोठे झाल्यावरही तोतरे बोलते का? असे असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर :  तुमचे मूल मोठे झाल्यावरही तोतरे बोलते का? असे असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. हा वाणीदोष मानसिक स्वास्थ्याशी जोडला जातो. मानसिक तणाव वा अस्वस्थता असेल, तर तोतरेपणा वाढतो. त्यामुळे तो कमी करण्यासाठी तणाव कमी करण्याचे उपाय उचित ठरतात. तोतरेपणाकडे दुर्लक्ष झाले, तर हळूहळू मूल आत्मविश्वास गमावते. त्यामुळे व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीनेही हे चुकीचे आहे, असे वेगवेगळ्या संशोधनात दिसून आले आहे.

व्यक्तिमत्त्व विकासासाठी स्वत:ची कौशल्ये विकसित करावी लागतात. त्याचबरोबर काही वैगुण्ये असतील, तर ती दूर करावी लागतात. तोतरे बोलणे हेसुद्धा असेच एक वैगुण्य आहे. तोतऱ्या बोलणाऱ्या व्यक्ती, मुलांना बरेचदा अपमानास्पद वागणूक मिळते. तोतऱ्या व्यक्तींच्या भाषेबाबत थट्टा करून त्यांचे किस्से अगदी रंगवून सांगितले जातात. मात्र, तोतरी भाषा बोलणाऱ्या व्यक्तीने योग्य सराव केल्यास ती स्पष्ट शब्द उच्चारू शकते. लहानपणी बरीच मुले तोतरी बोलतात. वय वाढते तसे हा त्रास कमी होतो. मानसिक तणाव वा अस्वस्थता असेल, तर तोतरेपणा वाढतो. तोतरेपणा कमी करण्यासाठी तणाव कमी करण्याचे उपाय उचित ठरतात. 

बोबडेपणा अन् तोतरेपणा यात फरक

बोबडे आणि तोतरे हे दोन्ही वाणीतील दोष आहेत. बोबडे बोलणारी व्यक्ती ‘र’, ‘क’ अशा काही अक्षरांचा उच्चार ‘ल’, ‘त’ असा करतात. तोतरे बोलणारी व्यक्ती उच्चार योग्य करते. पण, बोलताना अडखळते, शब्द पूर्ण न होता त्यांना मध्येच थांबायला होते. मात्र, बोबडेपणाची लक्षणे वेगळी असतात. बोबडेपणा वाणीदोष असला, तरीही त्याची लक्षणे वेगळी आहेत. मूल मोठे झाल्यावरही बोबडे बोलत असेल, तर याला कारणे वेगळी असतात. जसे श्रवणदोष, दुभंगलेले ओठ, टाळूमध्ये व्यंग बघावे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

कारणे काय असू शकतात?

वरिष्ठांची भीती, न्यूनगंड, आत्मविश्‍वासाचा अभाव, एखाद्या विषयातील कमकुवतपणा, रॅगिंग किंवा जन्मापासूनच व्यक्तींना तोतरी भाषा बोलण्याची सवय जडते. त्यातूनच ती तोतरी बनते. काही ठरावीक शब्द, सर्वसाधारण शब्द किंवा एकूण सर्वच शब्द उच्चारण्यास मनुष्य अडखळू लागतो. त्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर ठरावीक शब्दांबाबत अभ्यास आणि सराव केल्यास या समस्येवर प्रभावी नियंत्रण किंवा यापासून मुक्त होता येते. यासाठी मोठी संयम शक्ती, प्रखर आत्मविश्‍वास आणि इच्छाशक्तीची गरज आहे. ही प्रक्रिया अत्यंत संथ गतीने चालत असून, त्यासाठी तीन महिने, सहा महिने किंवा काही वर्षसुद्धा लागू शकतात.

तोतरे आणि बोबडे बोलणे या दोन्ही स्वतंत्र गोष्टी आहेत. तोतरे बोलणारी मुलं स्वतःला भावनिकदृष्ट्या असुरक्षित समजतात. मूल मोठे झाल्यावरही बोबडे बोलत असेल, तर त्यांचे ऑल स्ट्रक्चर आणि श्रवणदोष तपासावा लागतो. अर्थात प्रत्येक मूल वेगळे आहे. मात्र, वाणीदोषावर वेळीच उपाय हवा. स्पीच थेरपिस्टची मदत घेऊन मुलांना यातून बाहेर काढता येते. मुलांशी बोलत राहा. त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रेमळ स्पर्श आणि कौतुकाची थाप हवी.

- डॉ. धनश्री भिसेगावकर, स्पीच थेरपिस्ट

कशी मात कराल?

या समस्येवर सकाळी व सायंकाळी दोन तास इंग्रजी आणि मराठी पुस्तक मोठ्या आवाजात वाचणे, गायन करणे, स्रोत, पूजा, आरती भजन म्हणण्याचा प्रयत्न अडखळणाऱ्या शब्दांवर विशेष रियाज गप्पा, चर्चा, वाद-विवाद, वक्तृत्व स्पर्धांत भाग घेणे, नकारात्मक दृष्टिकोन टाळून सकात्मक विचार बदल धिम्यागतीने असले, तरी प्रयत्न सोडू नये.

असा करा सराव

उदाहरणार्थ ‘अ’चा योग्य उच्चार करता येत नाही. अशांनी ‘अऽऽऽ अर्जंट’ हा शब्द दीर्घ श्वास घेऊन उच्चारावा. त्यानंतर ‘अर्ज’, ‘अम्ब्रेला’, ‘अंकल’ अशा शब्दांचा सराव करावा. हेच इतर अक्षरांबाबत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindhudurg tourists drowned : मोठी बातमी! सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बुडाले

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत मोठी अपडेट समोर! दि. बा. पाटलांचे नाव देण्यावर अखेर शिक्कामोर्तब, उद्घाटन कधी?

Nilesh Ghaiwal: "तानाजी सावंतला मध्ये का घेतोस? मी घरी येतो नाहीतर.." गुंड निलेश घायवळचा धमकीवजा फोन कॉल

Dextromethorphan Cough Syrup: राजस्थानमध्ये हे कफ सिरप ठरतंय धोकादायक! डेक्सट्रोमेथॉर्फनबद्दल जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Drishyam 3 : आता येतोय दृश्यम 3 ! अजय देवगण 'या' तारखेला करणार सिनेमाची घोषणा

SCROLL FOR NEXT